अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या लापरवाहीमुळे वडिल व चिमुकलीच्या दुर्दैवी मृत्यू

अग्रवाल ग्लोबल कंपनी च्या विरोधात जनतेचा 4 तास रस्ता रोको आंदोलन

गोंदिया ( देवरी ) : महामार्ग क्रमांक 53 वर ग्राम बामणी खडकी जवळ सिंगल साईड रोड सुरू असल्यामुळे तीन दिवसांमध्ये हा तिसरा अपघात आहे अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या निष्काळजीपणामुळे व सेफ्टीच्या लापरवाहीमुळे दिवस रात्र सिंगर रस्ता सुरू ठेवून आणखी किती लोकांचा जीव घेणार असा प्रश्न जनतेसमोर उभा आहे
आज दिनांक 14 फेब्रुवारी रात्रीला 7.30 ते 8 वाजताच्या दरम्यान देवजी टोला जवळील पुलाजवळ कोहमारा कडून देवरीला मोटरसायकल क्रं MH 35 AT8624  वडील आणि मुलगी ही देवरी लाजात होतें.सिंगल रोड सुरू असल्यामुळे व रोड खोदून ठेवल्यामुळे मोटरसायकल चालकांना कमलीचा त्रास होतो देवरीच्या दिशेने येणारी ट्रॅव्हल्स क्रं CG 16 AF  0326 भर वेगात होती दरम्यान ट्रॅव्हल्स वाल्यांनी मोटरसायकल ला जोरदार धडक दिली ह्या धडकेत वडील  नामे सूरजलाल परसराम वासाखे वय 33 वर्ष व  वेदिका सूरजलाल वसाखे वर्षे 7  चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला
ब्राह्मणी खडकी येथील व परिसरातील जनतेने चार तास रस्ता बंद करून ठेवला प्रशासनाला जनतेने विनंती केली की तुम्ही अग्रवाल कंपनीच्या लोकांना बोलवा किंवा अश्व कंपनीच्या लोकांना बोलवा पोलीस प्रशासन यांनी अग्रवाल कंपनीच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना बोलविला नाही तीन दिवसांमध्ये ह्या परिसरात हे तिसरी घटना घडली आहे पण प्रशासन कोणतीही कारवाई करत का नाही असा प्रश्न जनतेसमोर निर्माण झाला आहे परिसरातील जनतेने व ब्राह्मणी खडकी येथील तरुण मंडळींनी अग्रवाल कंपनी अशोका कंपनी व पोलीस प्रशासन यांना विनंती केली आहे की येणाऱ्या सात दिवसात खोदलेला रोड दुरुस्त न झाल्यास खूप मोठा रस्ता रोको आंदोलन करू अशी अशी चिंतावणी दिली आहे
जनतेने पोलीस प्रशासनासमोर अग्रवाल कंपनीचे लोकांना बोलवा तेव्हाच मृतदेह उचलू देऊ असा हट्ट धर चार तास अडवून ठेवला माहितीप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी डूगगीपार पोलिश यांनी घटनास्थळ गाठून जनतेला समजूत घालून त्वरित अग्रवाल कंपनीने बंद केलेला रोड सुरू करून दोन्ही लाईन महामार्ग सुरू केला समोरची कारवाही डूगगीपार पोलीस करीत आहे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें