अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नीट, जेईई, सीईटी प्रवेश परीक्षा मार्गदर्शन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन. . .

अर्ज सादर करण्यास 1 एप्रिल अंतिम मुदत. . .

गोंदिया : महाराष्ट्र राज्यातील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 10 वी नंतर 2 वर्ष कालावधीमध्ये नामवंत खाजगी प्रशिक्षण संस्थेच्या सहाय्याने शासकीय आश्रमशाळेमध्ये अभियांत्रिकी व वैद्यकीय नीट, जेईई व सीईटी प्रवेश परीक्षांचे मार्गदर्शन वर्ग सत्र 2025-26 पासुन सुरु करण्यात येणार आहे. यासाठी दि.1 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी उमेश काशिद यांनी केले आहे.

सदर प्रवेश परीक्षा वर्गासाठी चाळणी परीक्षा घेण्यात येणार असून शासकीय, अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य रेसिडेंशिअल स्कुल व इतर शासकीय व खाजगी तथा मान्यताप्राप्त माध्यमिक शाळेतील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना चाळणी परीक्षेत बसण्याची संधी मिळणार आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यानी दि.1 एप्रिल पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, देवरी येथे अर्ज सादर करण्याचे आवाहन करन्यात आले आहे.

परीक्षा केंद्र : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी कार्यालयात आवेदन पत्र स्विकारले जातील. या प्रकल्पातील कोणत्याही एका आश्रमशाळेची निवड करुन त्या आश्रमशाळेवर परीक्षा घेण्यात येईल. सदर चाळणी परीक्षा ही मे 2025 मध्ये घेण्यात येईल.

अधिक माहीतीसाठी संपर्क. . .

सदर योजनेच्या अधिक माहितीकरीता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, देवरी येथील कार्यालयाच्या (07199) 251444 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने कळविले आहे.

योजनेच्या अटी व शर्ती . . .

विद्यार्थी महाराष्ट्राचा राज्याचा रहिवासी असावा. अनुसूचित जमातीच्या यादीतील असावा. त्याकरीता प्रवेशावेळी जातीचा दाखला बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असावे. तसेच आवेदनपत्रात नमुद माहिती खरी व अचूक असावी. सदर परीक्षेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी त्याच शैक्षणिक वर्षात 10 वी उत्तीर्ण असावा. निवड करण्यात येणाऱ्या नीट, जेईई व सीईटी या कोर्सकरीता प्रत्येकी 40 विद्यार्थ्यांपैकी 40 टक्के विद्यार्थी हे शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील असतील (प्रत्येकी 16 विद्यार्थी). 30 टक्के विद्यार्थी हे एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल मधील असतील (प्रत्येकी 12 विद्यार्थी). उर्वरित 30 टक्के विद्यार्थी शासकीय/खाजगी तथा मान्यताप्राप्त माध्यमिक शाळेत अनुसूचित जमातीचे प्रवेशित असलेले विद्यार्थी असतील (प्रत्येकी 12 विद्यार्थी).

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें