अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांना तसेच
वनपट्टे जमीन असलेल्या आदिवासी कुटूंबांना लाभ देण्यासाठी विशेष पंधरवाडा मोहिम

गोंदिया : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी मोहिम स्वरुपात राबविण्याकरीता तसेच वनपट्टे जमीन असलेल्या आदिवासी कुटूंबांना सदर योजनेअंतर्गत लाभ देण्याकरीता क्षेत्रीय स्तरावरुन 25 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये विशेष पंधरवाडा मोहिम सुरु झाली आहे.

        या मोहिमेत कृषि विभागाच्या विविध योजनांचे लाभ प्राप्त करुन घेण्यासाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. जिल्ह्यात फलोत्पादन व भाजीपाला पिकाचे क्षेत्र व उत्पादन वाढविण्याकरीता एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना राबविण्यात येत आहे. फलोत्पादन पिकाचा संशोधन, तंत्रज्ञान, प्रसार, काढणीत्तोर तंत्रज्ञान, प्रक्रिया व पणन सुविधा यांच्या माध्यमातून समुह पध्दतीने सर्वांगिण विकास करणे तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक राहणीमान उंचावणे, पारंपारिक उत्पादन पध्दतीची आधुनिक शास्त्रीय ज्ञानाची सांगड घालून तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार आणि प्रचार करणे इत्यादी या योजनेचे उद्दिष्ट आहे.

         एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत पुष्पोत्पादन विकास कार्यक्रम- सुटी फुले, मसाला पिके लागवड- हळद लागवड, सामुहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, फलोत्पादन यांत्रिकीकरण- ट्रॅक्टर संरक्षित शेती- हरीतगृह, प्लास्टीक मल्चिंग, कांदाचाळ, मधुमक्षिका पालन- मधुमक्षिका वसाहत संच वाटप, काढणीपश्चात व्यवस्थापन- पॅक हाऊस, एकात्मिक पॅक हाऊस, पुर्वशितकरण गृह, शितखोली, शितगृह, शितसाखळी, शितवहन, रायपनिंग चेंबर इत्यादी घटकांकरीता अनुदान देय आहे.

        तरी शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या ऑनलाईन संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावेत. ऑनलाईन लॉटरीमध्ये निवड झाल्यानंतरच प्राप्त लक्षांकाच्या मर्यादेत तालुका कृषि अधिकारी यांचे मार्फत पुर्वसंमती देण्यात येईल. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश कानवडे यांनी केले आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

छत्तीसगढ़ के आसमान पर बिखरेगी तिरंगे की झटा नया रायपुर में सूर्य किरण का रोमांचक एयर शो 5 नवंबर को फाइटर प्लेन मनूवर करते हुए बनाएंगे हार्ट, डायमंड, लूप, ग्रोवर, डान जैसी कई फार्मेशन नौ फाईटर प्लेन आधे घंटे तक आसमान में दिखाएंगे करतब