अवैध रेती वाहतुकीवर देवरी पोलिसांची कारवाई

तालुक्यात मोठय़ा प्रमाणात अवैध रेतीची वाहतूक होत आहे. सुत्रानीं दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी रेतीची अवैध वाहतूक करणारी गाडी आज पहाटे पकडली.


गोंदिया ( देवरी ) : देवरी शहराला लागुन असलेल्या छत्तीसगड राज्यातुन देवरी तालुक्यातुन गेलेल्या महामार्गाने मोठय़ा प्रमाणात अवैध रेतीची वाहतूक होत आहे. दि.25 जानेवारी ला देवरी पोलीसांना सुत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रक  क्र. – MH 49 AT  7566 आज दि.26 जानेवारी 2025 रोजी पहाटेच्या सुमारास देवरी शहराला लागुन असलेल्या रायपुर – नागपुर  महामार्गावरील मुरदोली परिसरात सुत्रानीं दिलेल्या माहितीच्या आधारावर तपासनी करत ताब्यात घेतला आहे. हा ट्रक ताब्यात घेत वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अवैध वाहतूक करणा:या रेती सम्राटांचे धाबे दणाणले आहेत. देवरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रविण डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाही करन्यात आली.

सुत्रानीं दिलेल्या माहतीच्या आधारावर  देवरी पोलिसांनी अडवलेला ट्रक तपासनी केला असता, या रेती वाहतूक करणा:या ट्रक चालकाकडे महाराष्ट्रात रेती वाहतुकीचा परवाना नव्हता. त्यामुळे पोलिसांनी सदर वाहन ताब्यात घेतले आहे. देवरी पोलिसांनी चौकशीकरिता ताब्यात घेतलेल्या ट्रक चालकांकडे महाराष्ट्र शासनाची स्वामित्वधन (रॉयल्टी) पावती नव्हती. या चालकांकडे पोलिसांनी  अधिक चौकशी केली असता छत्तीसगड राज्यातील धमतरी येथून ही रेती आणल्याचे चालकांनी सांगितले. त्यांच्याकडे रॉयल्टी भरल्याची पावती नसल्याने ट्रक वाहन ताब्यात घेण्यात आले आहे. या ट्रक वाहनात 9 ब्रास रेती असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यात वाहन , वाहन चालक व वाहनात अलेली अवैध रेती पोलिसांनी जप्त केली आहे. सदर विषयाचा तपास देवरी पोलिस करीत आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें