अवैध वीटभट्ट्यांनी देवरी तालुक्याचा श्वास कोंडला !

वाढत्या शहरीकरणामुळे बांधकामासाठी महत्त्वाचे साहित्य असलेल्या विटांच्या भट्ट्यांची संख्या देवरी तालुक्यात दिवसेंदिवस वाढत आहे; पण वीटभट्टी मालकांकडून प्रदूषण नियंत्रणासाठीच्या नियमांना हरताळ फासण्यात येत आहे.

मातीची सर्रास चोरी ; नियमांना वाटाण्याच्या अक्षता…

नागरिकांचे आरोग्य धोक्यात…

गोंदिया ( देवरी ) ; वाढत्या शहरीकरणामुळे बांधकामासाठी महत्त्वाचे साहित्य असलेल्या विटांच्या भट्ट्यांची संख्या देवरी तालुक्यात दिवसेंदिवस वाढत आहे; पण वीटभट्टी मालकांकडून प्रदूषण नियंत्रणासाठीच्या नियमांना हरताळ फासण्यात येत आहे. यामुळे तालुक्यातील रहिवाशांचा श्वास कोंडला आहे. ऐकिकडे देवरी तालुक्यातील भर्रेगाव क्षेत्रात अवैध मुरूम चोरी व शहरात अवैध वाळूची अवैध वाहतूक वाढली असतांनी अवैध वीट भट्ट्यांनी आता डोके वर काढले आहे.

देवरी तालुक्यात अंदाजे 30 ते 35 वीटभट्ट्या आहेत. मात्र, यासर्व वीटभट्ट्या विनापरवाना सुरू असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे पिंडकेपार, गोटाबोडी , ग्रामपंचायत परिसरात वीटभट्टी चालकांचा त्रास वाढला आहे. तर ऐकीकडे अवैध मुरूम चोरीमिळे कोट्यवधी रुपयांचा महसुल बुडत आहे. अवैध वाळूचोरीला राजकीय वरदहस्त असल्याने त्यावर कारवाई होत नाही. हे सारे असताना आता अवैध वीटभट्ट्यांचाही विषय आता देवरी तालुक्यात महत्त्वाचा ठरला आहे.

तालुक्यातील अनेक विटभट्यांची परवानगी संपुनही वीटभट्टी मालकांनी नव्याने नुतनिकरन केलेली नाही. वीटभट्टीसाठी लागणारी माती शेतातून चोरी केली जाते, तर काही शेतकरी माती विकतात. त्यालाही शासकीय परवानगी आवश्यक असते. प्रदूषणाचे नियमही पाळले जात नाहीत. वीटभट्टी लावण्यासाठी शेतजमीन अकृषक करणे आवश्यक असताना तेही केली जात नाही. वीटभट्टी चालकांची मनमानी वाढल्याने नागरिकांना त्रास होत आहे. गोटाबोडी परिसरातील वीटभट्टी चालकांनी तर रस्त्यालगदच विटभट्टी तानली असल्याचे चित्र आहे.

प्रतिक्रीया…

देवरी तालुका हद्दीतील साज्यात कार्यरत असलेले तलाठी यांना लवकरच चौकशी करुन अहवाल सादर करन्याचे आदेश देण्यात येईल व ज्या विट भट्टी मालकानीं कायदेशीर परवानंगी घेतली नसेन त्यांच्यावर दडांत्मक कारवाही करण्यात येईल. - नवनाथ कातकडे , तहसीलदार देवरी.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें