गोंदिया : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी गोंदिया जिल्ह्यात 25 ऑक्टोबर रोजी 08 उमेदवारांनी 09 नामनिर्देशपत्र दाखल केले व 33 अर्जाची उचल करण्यात आली आहे.
आज उमेदवारी अर्ज दाखल करणारे उमेदवार पुढीलप्रमाणे. 63-अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात एकही नामांकन अर्ज दाखल करण्यात आले नाही. 64-तिरोडा विधानसभा मतदारसंघातून राजेशकुमार मयाराम तायवाडे, राजकुमार धरमदास भेलावे- 2 नामांकनपत्र, संजय भुवनलाल अटरे, रविन्द्र हेमराज आग्रे यांनी अपक्ष नामांकन अर्ज दाखल केले आहेत. 65-गोंदिया विधानसभा मतदारसंघातून संतोष लक्षणे, चंद्रशेखर (बालू) लिचडे, दुर्वेश बिसेन यांनी अपक्ष नामांकन अर्ज दाखल केले आहेत. 66-आमगाव विधानसभा मतदारसंघातून यशवंत अंताराम मलये यांनी अपक्ष नामांकन अर्ज दाखल केले आहे.
आज उचल करण्यात आलेले अर्ज पुढीलप्रमाणे. 63-अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ- 13 अर्ज. 64-तिरोडा विधानसभा मतदारसंघ- 08 अर्ज. 65-गोंदिया विधानसभा मतदारसंघ- 07 अर्ज व 66-आमगाव विधानसभा मतदारसंघ- 05 अर्ज. असे एकूण 33 अर्जाची उचल करण्यात आली.









