आदिवासी विद्यार्थ्यांसाठी CSR निधीतून ५० संगणक संच भेट – डिजिटल शिक्षणाला चालना…

💻 भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया, देवरी शाखेचा उपक्रम!

गोंदिया ( देवरी ) : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा देवरी यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी (CSR Fund) अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी (जि. गोंदिया) अंतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळा व मुला-मुलींच्या वसतीगृहांतील विद्यार्थ्यांसाठी ५० संगणक संच भेट देण्यात आले.

या उपक्रमाचा उद्देश आदिवासी विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, डिजिटल शिक्षणात प्रावीण्य मिळवून देणे आणि इंटरनेटद्वारे अभ्यासातील शंका स्वयंपूर्णपणे सोडविण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. या संगणक संचांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच तंत्रज्ञानाच्या जगाची दारे खुली होतील.

कार्यक्रमादरम्यान श्री. चेटूले, व्यवस्थापक, भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा देवरी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना संगणक संचांचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना संगणकाच्या उपयोगाबद्दल आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व सांगत मार्गदर्शन केले.

या प्रसंगी मा.उमेश काशिद, प्रकल्प अधिकारी, ए.आ.वि.प्र. देवरी, डॉ. सायली चिखलीकर (स.प्र.अ.), श्री. निलेश राठोड, श्री. तोरकड सर तसेच प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मा. प्रकल्प अधिकारी उमेश काशिद यांनी भारतीय स्टेट बँकेचे मनःपूर्वक आभार मानत सांगितले की, “या संगणक संचांमुळे आदिवासी विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण व तंत्रज्ञानाशी जोडले जाण्याची सुवर्णसंधी लाभेल.”

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

छत्तीसगढ़ के आसमान पर बिखरेगी तिरंगे की झटा नया रायपुर में सूर्य किरण का रोमांचक एयर शो 5 नवंबर को फाइटर प्लेन मनूवर करते हुए बनाएंगे हार्ट, डायमंड, लूप, ग्रोवर, डान जैसी कई फार्मेशन नौ फाईटर प्लेन आधे घंटे तक आसमान में दिखाएंगे करतब