गोंदिया ( देवरी ) : विद्यमान आमदार सहसराम कोरोटे यांटी टिकीट पक्षश्रेष्टीने कापल्यांनतर महाविकास आघाडीच्या नवख्या उमेदवाराला टिकीट देण्यात आली तर महायुतीने संजय पुराम तर राष्ट्रीय गोंडवाना पार्टीने विलास भोगारे यांना टिकीट जाहीर केली. मतदानाच्या अंतीम टप्यावर विलास भोगारे यांना मिळालेल्या समर्थनामुळे आमगाव विधानसभेत यंदा चुरशीची लढत होण्याची शक्यता निर्मान झाली आहे. आदिवासी मतदारांचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात संजय पुराम 2014 ला आमदार म्हणुन कार्य केले तर 2019 ला सहसराम कोरोटे निवडून आले. आमगाव - देवरी विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. मात्र, 2019 च्या निवडणूकीत कॉंग्रेसचे आमदार असल्याने व या बालकिल्यात 2024 ला टिकीटीचा गणीत बिघडल्यामुळे कॉंग्रेस मधे मतभेद निर्मान झाल्याने येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आमगाव - देवरी मतदारसंघात महायुती विजयाच्या उबंरठ्यावर आहे तर राष्ट्रीय गोंडवानापार्टी महाविकास आघाडीच्या समोर असल्याची चर्चा मतदार संघात आहे.
या मतदारसंघात आदिवासी व OBC मतदारांची संख्याही लाखो आहे. ही मतं यंदा महायुतीचे उमेदवार असलेल्या संजय पुराम यांच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. मात्र, आदिवासी पारंपरिक मतदार राष्ट्रीय गोंडवाना पार्टीचे उमेदवार विलास भोगारे आणि महाविकास आघाडीचे राजकुमार पुराम यापैकी कोणाच्या पारड्यात दान टाकणार, यावर आमगाव मतदारसंघाचा निकाल अवलंबून आहे. 2014 साली आमगाव – देवरी मतदारसंघातून संजय पुराम भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. 2019 मध्येही कंग्रेसचे सहसराम कोरोटे यांनी आमगाव विधानसभा मतदारसंघात विजय मिळविला होता. मात्र विद्यमान आमदारानां तिकीट न दिल्याने कॉंग्रेस पक्षात नाराजीचे सुर अंतिम टप्यात अजूनही कायम असल्याचे दिसत आहे. परिणामी आमगाव मतदारसंघात संजय पुराम Vs विलास भोगारे Vs राजकुमार पुराम अशी तिहेरी लढत होईल. यामध्ये कोण बाजी मारणार, हे येत्या 23 नोव्हेंबरला स्पष्ट होनार आहे.
