आमगाव विधानसभा : महायुतीचे संजय पुराम  विरुद्ध राष्ट्रीय गोंडवाना पार्टीचे विलास भोगारे यांच्यात दुहेरी लढत ; तर महाविकास आघाडी तिसर्या स्थानावर

गोंदिया ( देवरी ) : अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या आमगाव विधानसभा-६६ क्षेत्राकरिता होणाऱ्या निवडणुकीत भाजपचे अधिकृत उमेदवार संजय पुराम विरुद्ध राष्ट्रीय गोंडवाना पार्टीचे अधिकृत उमेदवार विलास भोगारे यांच्यात दुहेरी सामना रंगणार हे आता उघड झाले आहे. विलास भोगारे यांची  ही विधानसभेची पहिलीच निवडणूक आहे. या दोघात होणाऱ्या अत्यंत चुरशीच्या लढतीत विजयी उमेदवार कोन ठरतो हे पाहण्याजोगे आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार तिसर्या स्थानी असल्याचे मतदारात चर्चा आहे.

अनेकांचे भोगारे यानां समर्थन…

विलास चाकाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून महायुती व महाविकास आघाडीची  डोकेदुखी वाढवण्याचे काम केले होते. पण ऐन वेळेवर चाकाटे यांनी विलास भोगारे यांना दिलेल्या समर्थनामुळेे आता खरी चुरस महायुतीचे संजय पुराम व राष्ट्रीय गोंडवाना पार्टीचे विलास चाकाटे यांच्यात निर्माण झालेली आहे. अपक्ष म्हणून लढाई लढणाऱ्या चाकाटे यांना त्यांच्या पक्षश्रेष्ठीकडून मनधरणी करण्यात जवळपास शंभर टक्के प्रयत्न केला पण चाकाटे यांनी अपक्ष उमेदवारी करत मित्रालाच खुला समर्थन जाहीर केला.

अपक्ष उमेदवार व इतर पक्षाच्या समर्थनाने भोगारे यांची ताकद दुप्पट झाली असल्याने  आता थेट लढत भाजपा विरुद्ध राष्ट्रीय गोंडवाना पार्टी अशी होणार आहे. त्यामुळे शिल्लक उरलेल्या 12 तासाच्या काळात  गुप्त प्रचार अधिक कोण करतो व आपआपल्या पक्षासाठी मते कसे मिळवतो हे येत्या २३ नोव्हेंबर च्या मतमोजणीतुन दिसणार आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें