गोंदिया : रस्त्यावरील वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी संपूर्ण देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो. याच पार्शस्वभूमीवर गोंदिया येथील उपप्रादेशीक परिवहन कार्यालय येथे 36 वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2025 चे उद्घाट समारंभ पार पडले.
या प्रसंगी राजेंद्र केसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नागेश भास्कर, पोलिस निरीक्षक (जिल्हा वाहतूक शाखा गोंदिया) हे उपस्थित होते. ओमप्रकाश सयाम, (मोटर वाहन निरक्षक) यांनी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियांतर्गत घेण्यात येणारे विविध उपक्रमाबद्दल सर्वांना अवगत केले. राजेंद्र केसकर (उपप्रादेशिक परिवन अधिकारी) यांनी लोकांना टू व्हीलर चालवताना हेल्मेट व फोर व्हीलर चालविताना सीट बेल्ट चा वापराबाबत आवाहण केले. तसेच सदर कार्यक्रमाचे सूत्र संचलन अमीत रौंदळ, प्रस्तावना पंकज आनंदपुरे व समारोप प्रसाद सुर्वासे यांनी केला.









