गोंदिया : गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे “दादालोरा पोलीस खिडकी” योजनेच्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक गोरख भामरे, मा. अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांचे संकल्पनेतून तसेच मा. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री विवेक पाटील, पोलिस स्टेशन केशोरी चे ठाणेदार श्री. मंगेश काळे यांचे मार्गदर्शनाखाली सशस्त्र दूरक्षेत्र गोठणगाव, रोटरी क्लब ऑफ नागपूर साऊथ ईस्ट व शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी विकास हायस्कूल गोठणगाव येथील 5 वी ते 10 वी च्या एकूण 54 विद्यार्थ्यांच्या 2 दिवशीय मोफत सहलीचे आयोजन करण्यात आले.
पोलिस विभागाच्या वाहनाने सर्वांना नागपूर येथे एक पोलिस कर्मचाऱ्यांसह पाठवण्यात आले, नागपूर येथे महाराजा बाग, दीक्षा भूमी, गणेश टेकडी मंदिर, स्वामी नारायण मंदिर येथे भेट देऊन देवदर्शन घेतले. श्री अश्विन रडके ओ.एस.डी. मेघे हॉस्पिटल नागपूर यांच्या सहकाऱ्याने शालिनीताई मेघे हॉस्पिटल येथे सर्व विद्यार्थ्यांचे मोफत आरोग्य तपासणी तसेच जेवणाची व राहण्याची सोय करण्यात आली. दुसऱ्या दिवशी श्री राजीव वरभे पास्ट प्रेसिडेंट व श्री गिरीश मेहता प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ नागपूर साऊथ ईस्ट यांच्या पुढाकाराने मेट्रो सफर करण्यात आली. गोठणगाव सारख्या आदिवासी व दुर्गम नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनी कधी न पाहिलेली मेट्रो रेल्वे मोठ्या उत्साहाने पाहिली. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसत होता, पुढे रमण सायन्स सेंटर येथे भेट देऊन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने विविध प्रदर्शने दाखवण्यात आली.
सर्व विद्यार्थ्यांना रोटरी क्लब तर्फे पाणी बॉटल गिफ्ट देण्यात आले.
सदर सहलीचे यशस्वी नियोजन हे एओपी गोठणगाव चे प्रभारी अधिकारी निळकंठ गित्ते यांच्या पुढाकाराने तसेच प्रपोगंडा सेल गोंदिया चे भास्कर हरिणखेडे व जिल्हा पोलिस चे हवालदार भावते, थेर, मिसार यांच्या मदतीने करण्यात आले.








