एओपी गोठणगाव परिसरातील 48 रुग्णांना मिळाली नवी दृष्टी

गोंदिया पोलिस दादालोरा खिडकी योजनेअंतर्गत 48 रुग्णांवर शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर येथे निःशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया

गोंदिया : गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे  “दादालोरा पोलीस खिडकी” योजनेच्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक गोरख भामरे,  मा. अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांचे संकल्पनेतून तसेच मा. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री विवेक पाटील, पोलिस स्टेशन केशोरी चे ठाणेदार श्री. मंगेश काळे यांचे मार्गदर्शनाखाली सशस्त्र दूरक्षेत्र गोठणगाव, रोटरी क्लब ऑफ नागपूर साऊथ ईस्ट व शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा गोठणगाव येथील दुर्गा चौक येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर आरोग्य शिबिराचा परिसरातील गरजवंत 240 नागरिकांनी लाभ घेतला. त्यापैकी 57 रुग्णांना पुढील तपासणी व शस्त्रक्रिया करण्यासाठी शालिनीताई मेघे हॉस्पिटल येथे बोलवण्यात आले होते, 57 रुग्णांपैकी 48 रुग्ण हे स्वेच्छेने जाण्यास तयार असल्याने मेघे हॉस्पिटल ची बस बोलावून निःशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथे रवाना करण्यात होते. सर्व रुग्णांवरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने आज रोजी दवाखान्याच्या बस ने सर्वांना आप-आपल्या घरी सुखरूप पोहचवण्यात आले आहे. आदिवासी बहुल व दुर्गम भागात जेथे आरोग्याच्या सुविधा अजून पोहचल्या नाहीत अशा ठिकाणी पोलिस प्रशासनाच्या पुढाकाराने जनजागृती होताना दिसत आहे. आरोग्याबाबत अनास्था असलेल्या नागरिकांना जागरूक करुन त्यांची हिरावलेली दृष्टी पुन्हा मिळवून देण्यासाठी एओपी गोठणगाव येथील प्रभारी अधिकारी PSI गित्ते व सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें