गोंदिया ( गोठणगाव ) : गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे “दादालोरा पोलीस खिडकी” योजनेच्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक गोरख भामरे, मा. अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांचे संकल्पनेतून तसेच मा. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री विवेक पाटील, पोलिस स्टेशन केशोरी चे ठाणेदार श्री. मंगेश काळे यांचे मार्गदर्शनाखाली आज रोजी सशस्त्र दूरक्षेत्र *गोठणगाव* येथे मोफत बांबू प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. सदर कार्यशाळेसाठी Mahatma Gandhi Institute for Rural Industrialization- MGIRI वर्धा या संस्थेचे श्री मनोज शर्मा, डॉ. प्रशांत तायडे, श्री दिलीप वर्मा, श्री निलेश काटेकर, श्री गणेश डगवार व श्री गणेश थेरे यांनी MGIRI संस्थेअंतर्गत येणारा प्रत्येक विभाग जसे 1) खादी व टेक्सटाइल 2) बायो अँड हर्बल 3) रुरल केमिकल इंडस्ट्री 4) रुरल क्राफ्ट अँड इंजिनियरिंग 5) रुरल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रकचर 6) मॅनेजमेंट अँड सिस्टम या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच आदिवासी बहुल व दुर्गम – जंगल भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी टाकावू वस्तू पासून टिकावू वस्तू बनवन्याच्या आधुनिक पद्धती बाबत सविस्तर मार्गदर्शन केले, तसेच बांबू पासून बनविण्यात येणाऱ्या सर्व वस्तूंचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. सदरच्या रोजगाराभिमुख कार्यशाळेसाठी एओपी गोठणगाव परिसरातील 165 शेतकरी महिला – पुरुष व विद्यार्थ्यांनी हजेरी लावून प्रशिक्षण घेतले. सदर प्रशिक्षणाचा फायदा घेऊन शेतकरी आपले उत्पन्न वाढवण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहतील अशी आशा बाळगण्यात आली. सदर कार्यक्रम मा. ठाणेदार केशोरी श्री मंगेश काळे यांच्या अध्यक्षतेखाली व एओपी गोठणगाव चे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक निळकंठ गित्ते यांच्या पुढाकाराने पार पडला. कार्यक्रमास सफौ अंबुले, मडावी हवालदार भोवते, मिसार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.









