देवरी तालुक्यातील अनेक भागांत वीज कंपनीतर्फे गावामध्ये स्मार्ट मीटर लावण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे….
गोंदिया ( देवरी ) ; देवरी तालुक्यातील कन्हाळगाव येथे स्मार्ट मीटरला नागरिकांनी कडून विरोध केला जात आहे. नागरिकांनी एकमताने ग्रामसभेमध्ये स्मार्ट मीटर लावण्याला विरोध केला. तसा ठरावच ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आला असुन उपविभागीय अभियंता विद्युत विभाग देवरी यानां निवेदन देण्यात आला आहे. देवरी तालुक्यात अजून हजारो मीटर बसविण्याचे काम बाकी आहे. टप्प्याटप्प्याने हे मीटर लावण्यात येऊन यानंतर त्यामध्ये रिचार्ज करून वीज विकत घ्यावी लागेल. त्यामध्ये सिम असल्यामुळे सुरुवातीला ते ग्राहकांना बिल देतील व त्यानंतर तेच मीटर पोस्टपेड किंवा प्रीपेड करतील. त्यातील रिचार्जनुसार वीज ग्राहकाला उपलब्ध होईल, असे सांगण्यात येते. त्यास अनेक ठिकाणी विरोध होत असुन स्मार्ट मिटर गावात न लावन्याचा कन्हाळगाव ग्रामंपचायतनी ठरावच घेतला आहे.
स्मार्ट मीटर लावल्यामुळे जे व्यक्ती एका महिन्यात किती युनिटचा वापर केला आहे ते पाहण्यासाठी येतात, त्यांची सुद्धा गरज भासणार नाही. त्यामुळे युनिटचे रीडिंग घेण्यासाठी येणारे अनेक लोक बेरोजगार होतील. कन्हाळगाव ग्रामपंचायतमध्ये घेण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत हा मुद्दा मांडण्यात आला. गावात स्मार्ट मीटर लावायचे नाही, असा ठराव कन्हाळगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये घेण्यात आला. स्मार्ट मीटरला विरोध करण्याचा ठराव हा गावातील प्रथम नागरीक सरपंच समिता किशोर कटरे, जिल्हा परिषद सदस्या कल्पना वालोदे, विठ्ठल गावळ, राजेन्द्रं बिसेन, उमेशजी मडावी, तेजपालजी लटये, किशोर कटरे, प्रिविण गिरी, पदाधिकारी व गावातील नागरिकांनी हा ठराव मांडत संबधित विभागाला निवेदन दिला. स्मार्ट मीटरला ठिकठिकाणी विरोध होत आहे, पण देवरी तालुक्यातील कन्हाळगाव ग्रामपंचायतीने प्रथमच स्मार्ट मीटरला विरोध दर्शवणारा ठराव घेतल्याचे दिसते आहे.









