कवायत मैदान पोलीस मुख्यालय गोंदिया येथे २१ ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृती दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

गोंदिया : पोलीस स्मृतीदिन-२०२५ कार्यक्रमा निमित्त कर्तव्यार्थ असताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व जवान या हुतात्म्यांना दिनांक २१ ऑक्टोबर २०२५ रोजी कवायत मैदान, पोलीस मुख्यालय गोंदिया (कारंजा) येथे शोक सलामी देवून श्रध्दांजली अर्पण करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गोंदिया मा. श्री प्रजित नायर व पोलीस अधिक्षक गोंदिया मा. श्री गोरख भामरे यांनी पोलीस हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले.

सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गोंदिया मा. श्री प्रजित नायर यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त संबोधीत करुन शहीद पोलीस अधिकारी व जवान यांच्या प्रति भावपुर्ण श्रध्दांजली आहेत, ज्यांनी वेळोवेळी कर्तव्य पथावर अग्रेसर असताना लोकतंत्र रक्षणार्थ आपल्या जीवाची पर्वा न करता “आपला आज” देशवासीयांच्या “उद्यासाठी” हसत खेळत स्वतःचे प्राण अर्पण केलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणुन २१ ऑक्टोबर हा दरवर्षी भारतभर पोलीस स्मृतीदिन म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे सांगुन पोलीस स्मृती दिनानिमित्त थोडक्यात संदेश वाचवुन दाखविले.

२१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस प्रशासनासाठी अत्याधिक महत्वाचा आहे. या वर्षीदेखील (दिनांक ०१/०९/२०२४ ते ३१/०८/२०२५ या कालावधीत) संपुर्ण भारतामध्ये आपले कर्तव्य बजावित असताना शहीद झालेल्या एकुण १९१ पोलीस अधिकारी व जवानांची नावे सहायक पोलीस निरीक्षक श्री विनायक दळसपाटील व पोलीस उप-निरीक्षक श्री श्रीकांत हत्तीमारे यांनी वाचुन दाखविले. शोक सलामी परेड मध्ये गोंदिया जिल्हा पोलीस दलातील प्लाटुन कमांडर रापोउपनि श्री दिपक शेंडे व त्यांच्या अंमलदारांसह रापोनि गोंदिया श्री राजेश सरोदे यांनी शहीद पोलीस स्मृतीदिन सलामीचे नेतृत्व करुन शहीदांना शोक सलामी देण्यात आली व सलामी परेड मधील पोलीस अंमलदारांकडुन प्रत्येकी तीन राऊंड हवेत फायर करण्यात आले.

तदनंतर प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गोंदिया मा. प्रजित नायर यांनी शहीद कुटुंबीयांची भेट घेतली व भविष्यात कोणतीही अडचण आली किंवा मदत लागली तर ते पुर्ण करण्याचे आश्वासन ही दिले. सदर कार्यक्रमात मा. प्रमुख अतिथी यांच्यासाह पोलीस अधिक्षक गोंदिया मा. श्री गोरख भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया श्रीमती रोहीणी बानकर व इतर पोलीस अधिकारी/अंमलदार तसेच शहीदांचे कुटुंबीय हे मोठया संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन मपोहवा मंगला प्रधान यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरिता रापोनि श्री राजेश सरोदे, रापोउपनी दीपक शेंडे, श्रेणी पोउपनि रोशन उईके, सफौ मुस्तफा सरवर, पोहवा पंकज पांडे, मपोहवा मंगला प्रधान, पोहवा राज वैद्य, पोकॉ राकेश उके व काळे तसेच वाद्यवृंद पथक चे पोहवा देविदास तायवाडे व त्यांची टिम यांनी अथक परिश्रम घेतले.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

छत्तीसगढ़ के आसमान पर बिखरेगी तिरंगे की झटा नया रायपुर में सूर्य किरण का रोमांचक एयर शो 5 नवंबर को फाइटर प्लेन मनूवर करते हुए बनाएंगे हार्ट, डायमंड, लूप, ग्रोवर, डान जैसी कई फार्मेशन नौ फाईटर प्लेन आधे घंटे तक आसमान में दिखाएंगे करतब