केशोरीत कबड्डी स्पर्धेचे बक्षीस वितरण

उद्घाटन सभापती अनिल बिसेन तर बक्षीस वितरण इंजि.दिशांत चन्ने यांच्या हस्ते

गोंदिया ( देवरी ) :  भारतीय संस्कृतीला मान देऊन प्रत्येक तरुणांमध्ये देशी खेळांचे आकर्षण व्हावे,  या हेतूने दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर तालुक्यातील केशोरी येथे दोन दिवसीय क्लोज कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  या कबड्डी स्पर्धेचे उदघाटन आमदार संजय पुराम यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीचे सभापती अनिल बिसेन यांनी केले.
       यावेळी माजी सभापती अंबिका बंजार, माजी पोलिस पाटील उमराव जामकाटे, ग्राम पंचायत सदस्या रेवन फुलकवर, सामाजिक कार्यकर्ते मोहन भैसारे, विद्याप्रसाद मडावी, धरमदास उईके, डुमान नेताम, सरजूराम कोल्हा, रेंगसू कोल्हा, श्रीराम कुंभरे, मन्नूलाल सर्पा, रामलाल जामकाटे आदी उपस्थित होते.
       या कबड्डी स्पर्धेचे बक्षीस भाजप युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री दिशांत चन्ने यांच्याहस्ते देण्यात आले.  यावेळी आरोग्य सेवक दुर्गेश जामकाटे, प्रा. सोहन कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते सुरेन गोटे, हिरासिंग उईके, उमराव जामकाटे, निर्मल वाघाडे, लालचंद नरेटी, मोहन भैसारे, डुमान नेताम आणि प्रेमकुमार फुलकवर आदी उपस्थित होते.
       यशस्वीतेसाठी मंडळ अध्यक्ष जितेन्द्र गोटा, उपाध्यक्ष पंकज नेताम, सचिव अविनाश जामकाटे, कोषाध्यक्ष डोमेन्द्र जामकाटे, ईश्वर कोल्हा, क्रिडा प्रमुख किशन उईके, डेवीड नेताम आणि इतर कार्यकर्त्यांनी सहकार्य केले आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

छत्तीसगढ़ के आसमान पर बिखरेगी तिरंगे की झटा नया रायपुर में सूर्य किरण का रोमांचक एयर शो 5 नवंबर को फाइटर प्लेन मनूवर करते हुए बनाएंगे हार्ट, डायमंड, लूप, ग्रोवर, डान जैसी कई फार्मेशन नौ फाईटर प्लेन आधे घंटे तक आसमान में दिखाएंगे करतब