चिचगड – ककोडी जिल्हापरीषद क्षेत्रातील रसत्यातवर खड्डेच – खड्डे….
गोंदिया देवरी ( चिचगड ) : ककोडी या प्रमुख रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून सबधित विभाग व जन्तेनी निवडुन दिलेल्या जनप्रतिनीधीच्या दुर्लक्षित पणामुळे मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. कुठे खड्डे चुकविताना तर कुठे खड्यांमधून रस्ते शोधताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या खड्डेमय रस्त्यांवरून जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागत असल्याने कमालीचा संताप वाहनचालकांकडुन व्यक्त केल्या जात आहे. खड्डे चुकविताना संतुलन बिघडल्याने कित्येक दुचाकीस्वार पडून जख्मी झाले आहेत. या चिचगड – ककोडी मुख्य रस्त्यांबरोबरच ग्रामीन भागातील रस्त्यांचीही दुरावस्था झाली आहे. रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. कित्येक दिवसांपासून रस्त्यांवरील खड्डे उघड्या डोळ्याने दिसत असतांनाही संबंधित विभाग , या विधानसभा क्षेत्रातील आमदार व जिल्हापरिषद क्षेत्रातील सदस्य खड्डे बुजविण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे वाहनचालकांचे म्हनने आहे.
चिचगड – ककोडी या मुख्य मार्गांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने या रस्त्याला पांदण रस्त्याचे स्वरूप आले आहे. रस्त्यांची झालेली अवस्था बघता खड्डेमय रस्त्यांचे हे जिल्हापरिषद क्षेत्र म्हणून चिचगड – ककोडी जिल्हापरिषद क्षेत्राची ओळख निर्माण होतांना दिसत आहे. प्राथमिक सोयी सुविधांपासूनही हा चिचगड – ककोडी जिल्हा परिषद क्षेत्र दुर्लक्षित राहिला आहे.
अनेक तक्रारी तरी कार्य नाही…
या चिचगड – ककोडी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून हा रस्ता पूर्णतः उखडला असतानाच ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीकरिता स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत संबधित विभागाकडे तक्रारी केल्यानंतर मुरूम मातींनी काही खड्डे बुजविण्याचा बांधकाम विभागाने दिखावा केला होता पण नुकत्याच झालेल्या पावसाने खड्ड्यातील मुरूम माती वाहून गेल्याने खड्डे जैसेथेच झाले आहेत. या चिचगड – ककोडी मार्गाचीही अत्यंत वाईट अवस्था झाली असुन या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्ताच खड्यात गेल्याचे पाहायला मिळत आहे. चिचगड – ककोडी रस्ता तर आपल्या दुर्दैवावर अश्रू ढाळत आहे. कित्येक दिवसांपासून हा रस्ता दुर्लक्षित असून बांधकाम विभागाने या रस्त्याला तालुक्याच्या हद्दीतूनच वगळले आहे की, काय असे वाटू लागले आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने या रस्त्यावरून वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या क्षेत्रातील गाव खेड्यांकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांची दुरावस्था झाल्याने संबंधित विभागा विषयी नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे.
खड्डेमय रस्त्यांचे क्षेत्र म्हणून चिचगड – ककोडी जिल्हा परिषद क्षेत्राची ओळख…
खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात कित्येक दुचाकीस्वार अनियंत्रित होऊन पडल्याने त्याना गंभीर जख्मा झाल्या आहेत. या चिचगड – ककोडी प्रमुख रस्त्याच्या दुरुस्तीकरणाकडे दुर्लक्ष व्हावे ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. कित्येक दिवसांपासून प्रमुख रस्त्यांवर पडलेले खड्डे उघड्या डोळ्याने दिसत असतानाही ते बुजविण्याची आवश्यकता संबंधित विभागाला वाटत नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात मोठा अपघात झाल्यास त्याचे नवल वाटू नये. या रस्त्यांवरून कित्येक दुचाकीस्वार घसरून पडून जख्मी झाले आहेत. रस्त्यांची झालेली दुरावस्था व ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे खड्डेमय रस्त्यांचे क्षेत्र म्हणून चिचगड – ककोडी जिल्हा परिषद क्षेत्राची ओळख निर्माण होऊ लागली आहे.









