खासदार महोत्सवात आदिवासी विकास विभागातील विद्यार्थ्यांचा सहभाग

नागपुर: दिनांक 13 जानेवारी ते 16 जानेवारी 2025  दरम्यान नागपूर येथे आयोजित खासदार क्रिडा महोत्सव मध्ये आदिवासी विकास विभागामधील विद्यार्थ्यांनी आपले क्रीडा कौशल्य व नैपुण्य दाखवून विविध क्रीडा प्रकारामध्ये पुन्हा एकदा यश प्राप्त केले आहे.
विभागीय क्रिडा संकुल, मानकापुर, नागपूर येथे आयोजित खासदार क्रिडा महोत्सवात सहभागी होणाऱ्या विविध स्तरावरील खेळाडू नॅशनल क्लब तसेच स्थानिक ॲथलेटिक्स क्लब व इतर संवर्गातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. सदर क्रिडापटुंचे तंत्रज्ञान व  टेक्निक्स या सर्व बाबी  आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांना जवळून अनुभवता याव्यात, तसेच शिकता याव्यात यासाठी प्रकल्प अधिकारी, देवरी यांनी आपल्या प्रकल्पामधील मोजक्या क्रीडापटु विद्यार्थ्यांना उक्त महोत्सवात सहभाग नोंदविण्यासाठी आवश्यक प्रयत्न केले. आदिवासी विद्यार्थ्यांनी आपले क्रीडा कौशल्य दाखवून विविध क्रीडा प्रकारात प्रथम, व्दितीय  व तृतीय क्रमांक प्राप्त् करून 03 सुवर्ण, 06 रजत, 03 कास्य पदक प्राप्त केले.
1) जयकुमार कमरो, अनु.आश्रमशाळा,सिरेगाव बांध (गोळाफेक व थाळीफेक – प्रथम), 2) कु. प्रतिक्षा सलामे, शास.आश्रमशाळा, ईळदा (भालाफेक-प्रथम), 3) कु.करिना मडावी, अनु.आश्रमशाळा देवलगाव ( 800 मी. व 1500 मी. धावणे- व्दितीय क्रमांक), 4) कु.विशाखा सलामे, शास.आश्रमशाळा ईळदा (उंची उडी- व्दितीय व किड्स भाला- तृतीय क्रमांक), 5) वैभव ब्राम्हणकर शास.आश्रमशाळा जमाकुडो (गोळाफेक- व्दितीय क्रमांक), 6) मनिष सहाळा, अनु.आश्रमशाळा,देवलगाव- (लांब उडी- व्दितीय क्रमांक), 7) यशकुमार उसेंडी, अनु.आश्रमशाळा,देवलगाव – ( गोळाफेक- व्दितीय क्रमांक), 8) कु.आशा चुलपार, शास.आश्रमशाळा, शेंडा- ( उंच उडी- व्दितीय क्रमांक)

या स्पर्धेत प्रकल्प कार्यालय, देवरी अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी प्रथमच सहभाग नोंदविला. यामुळे विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारातील आधुनिक व प्रशिक्षित खेळांडुसोबत स्पर्धा करण्याचा तसेच मोठ्या स्तरावरील क्रीडा स्पर्धेत कामगिरी करण्याचा अनुभव प्राप्त झाला. महोत्सवात सहभागी  इतर संवर्गाच्या सर्व स्पर्धकांकडून उपयोग करण्यात येणाऱ्या विविध तंत्रज्ञानाची तसेच तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून  विद्यार्थ्याना क्रीडा विषयक माहिती प्राप्त होण्यास मदत झाली.. तसेच त्यांच्याकडून वेगवेगळया क्रिडा विषयक कौशल्य (टेक्निक्स)  शिकण्याची संधी प्राप्त झाली.  यामुळे भविष्यात येणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना निश्चितच  फायदा होईल. अशी प्रतिक्रिया खासदार क्रिडा महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या विविध क्रिडा क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांनी दिल्या.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें