गटबाजी अन् नाराजीही; आघाडीच्या उमेदवारापुढे अंतर्गत राजकारणाचे आव्हान तर राष्ट्रीय गोंडवाना पार्टीचा मतदारसंघात बोलबाला…

गोंदिया (देवरी) : आमगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराला अजुनही पक्षातंर्गत गटबाजी, नाराजी दूर करावी लागत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरी कडे राष्ट्रीय गोंडवाना पार्टीचे विलास भोगारे यांचा वर्चस्व आमगाव – देवरी विधानसभा मतदार संघात वाढत असल्याने आता महायुती व महाविकास आघाडीत भीती वाढली असून  कोण बाजी मारणार ह्या चर्चांना उधान आलेला आहे. 

आमगाव – देवरी विधानसभा  मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पक्षातंर्गत गटबाजी, नाराजी दूर करण्यात व्यस्त आहा. तर दुसरीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. आमदार सहसराम कोरोटे हे नाराज असल्याची चर्चा आहे तर काॅंग्रेसमधील गटबाजी राेखण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार असमर्थ ठरत आहेत. आमगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपने ( महायुती ) माजी आमदार संजय पुराम यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीने आमदार सहसराम कोरोटे यांना डावलुन नवखे उमेदवार राजकुमार पुराम यांना उमेदवारी जाहीर केल्याने कोरोटे हे नाराज असल्याची चर्चा मतदार संघातील कार्यकर्त्यात आहे. तर राष्ट्रीय गोंडवाना पार्टी , बिरसा ब्रिगेड व CFR या संघटेनेचे उमेदवार विलास भोगारे हे त्या पुराम वर भारी पडन्याची चर्चा मतदार संघात जोर धरु लागली आहे.

विशेषता कॉंग्रेसच्या पक्ष श्रेष्टीने आमगाव विधानसभेत दिलेल्या उमेदवाराबाबत नियोजना अभावी एकूणच किती नाराजी आहे हे महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यात दिसून येत आहे. ज्यामुळे मतदानाच्या तोंडावर पक्षात गटबाजीला सुरूवात झाली आहे. काॅंग्रेसमधील स्वकियांकडूनच आता धोका असल्याची स्थिती आमगाव विधानसभेत निर्माण झाली आहे. काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर अद्यापही प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन होत नसल्याची बाब पक्ष श्रेष्टीपर्यंत पोहोचली असल्याची चर्चा आहे. काँग्रेसमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त होती. परंतू दिवंगत आमदार सहसराम कोरोटे यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे. कॉंग्रेसचे राजकुमार पुराम  यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही प्रचारासाठी प्रमुख पदाधिकारी मनापासून एकत्र येत नसल्याची बाब निदर्शनास येत असून कार्यकर्ते विखुरले असल्याची चर्चा मतदार संघात आहे. ज्याचा फायदा विलास भोगारे यांना होत असुन महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यासह मित्र पक्षातीलही कार्यकर्ते व पदाधीकारी त्यांच्या सोबत असल्याची चर्चा मतदार संघात रंगु लागल्या आहेत.

विलास भोगारे त्या पुरामला पडणार भारी…

आमगाव – देवरी  विधानसभा मतदार संघात 2014 ते 2019 या काळात महायुती व महाविकास आघाडी असी थेट लढत झाली. पंरतु 2024 यंदाच्या विधानसभा निवडणूकीत दोघात तिसरा आल्याने या निवडणूकीत राष्ट्रीय गोंडवाना पार्टी , बिरसा ब्रिगेड व CFR संघटनेचे उमेदवार विलास भोगारे त्या पुरामला भारी पडण्याची चर्चा असुन भोगारे हे विजयाकडे वाटचाल करत असल्याचीही चर्चा मतदार संघात चांगलीच रंगत आहे.

मतदारांचा कल भोगारे कडे… 

महाविकास आघाडीत नवा चेहरा भेटावा अस्या चर्चेला सुरूवातीला उधान होता. शेवटी महाविकास आघाडीने नवखा चेहरा मतदार संघात दिला. पंरतु नियोजना अभावी कार्यकर्ते दुरावत असल्याने महाविकास आघाडी आमगाव – देवरी विधानसभा मतदार संघात  बाजी मारणार का..? हा प्रश्न चिन्ह महाविकास आघाडीतीलच पदाधीकारी व कार्यकर्तानां पडला आहे. तर दुसरी कडे मतदारांचा कल आता राष्ट्रीय गोंडवाना पार्टी , बिरसा ब्रिगेड व CFR चे युवा उमेदवार विलास भोगारे यांच्याकडे असलाने मतदारसंघात तिरंगी लढत पहायला मिळणार आहे.

विलास भोगारे यांचे आवाहन…

निवडणूक सुरू झाली की, उमेदवार नवनव्या योजना करुन मतदार संघ पिंजून काढन्याचा प्रयत्न करतो. अनेक खोटे आश्वासन मोठ – मोठे वादे करुन मतदारांना आपल्या प्रवाहात आनण्याचा प्रयत्न करतो परंतू विलास भोगारे हे जल – जमीन – जंगल व मतदारांच्या हक्कासाठी , बेरोजगार युवकांच्या रोजगारासाठी निवडणूक लढत असून या विधानसभेत विजय आपलाच होणार व गुलालही आम्हीच उळवनार असल्याचेही त्यांनी सांगीतले आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें