गोंदिया ( देवरी ) : गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे मा. पोलीस अधीक्षक श्री गोरख भामरे साहेब गोंदिया यांचे सुचनेप्रमाणे मा. श्री अभय डोंगरे सा. अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, यांचे मार्गदर्शणात मा. श्री विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधीकारी सा., उपविभाग देवरी, पोलीस निरीक्षक प्रविण डांगे सा. पोलीस स्टेशन देवरी यांनी स्वतः सहभाग घेवुन हिंदुबांधवांचा गणेश उत्सव मंडळाकडुन तसेच दिनांक ०५/०९/२०२५ रोजी मुस्लीम बांधवांचा ईद-ए-मिलाद सन साजरा करण्यात येत असून उत्सव दरम्यान कायदा व सुव्यवस्था आबाधित राहावी याकरीता उत्सव शांततेत पार पाडण्या करीता देवरी शहरात पोलीस स्टेशन देवरी च्या वतीने चिचगड रोड, मुख्य बाजारपेठ, दुर्गा चौक, गणेश चौक, कारगील चौक, पंचशिल चौक, मसक-या चौक, संजय नगर, परिसर विविध मार्गाने रुट मार्च काढून रुट मार्च करीता पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस अंमलदार, तसेच उपविभागातील पोलीस स्टेशन-अर्जुनी / मोर, चिचगड, डुग्गीपार, नवेगाबांध, केशोरी येथील प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार, तसेच उपविभागीय कार्यालय येथील अधिकारी व अंमलदार, पोलीस उपमुख्यालय देवरी येथील अधिकारी व पोलीस अंमलदार, व गृहरक्षक, सी-६० पार्टी तसेच सँग पथक येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे सह शस्त्र, लाठी, ढाल, हेलमेट, परिधान करून कायदा व सुव्यवस्था आबाधित राहावी याकरीता रुट मार्च काढण्यात आले.









