गुन्हा दाखल : हायवे हॉटेलसमोर तलवारबाजी करने ट्रकचालकास पडले महागात.

               दोन्ही ट्रक चालकावंर गुन्हा दाखल…

देवरी  ; देवरी शहराला लागुन असलेल्या हायवे हॉटेल समोर दोन ट्रक चालक आपसात वाद घालत असतानीं ऐका ट्रकचालकाने तलवार काढत तलवार बाजी करन्याचा प्रयत्न केला. पांडुरंग हरिभाऊ पोटफोडे वय 28 वर्ष रा.शिऊर ता.जामखेड जि.अहमदनगर  व भरत बळीराम तांबे वय 37 वर्षे रा. उंबरहीरा ता. पाटोदा , जि. बीड याचेवर कलम 4,25 शस्व अधिनियम सह कलम 194(2) भारतीय न्याय सहिता सह कलम 85 (1) म.दा. का. अन्वये देवरी पलिस्टेस येथे गुन्हा नोंद करण्यात आले आहे.

सविस्तर असे की, दि. 04 जानेवारी 2025 रोजी पो.स्टे, देवरी येथे  सायंकाळी 6.00 वाजतादरम्यान न्यू हायवये धाबा चे मॅनिजर रविकुमार रामटेके यानी फोनद्वारे पोलिसांना सांगीतले की धाब्यासमोर ट्रक क्र.एम. एच. G4 एल.वाय. 7155 व  ट्रक क्र.एन.एल.07 एए.2142 चे मालक हे आपसात भांडण करत असुन  शिवीगाळ् करीत आहेत त्यापैकी एका ईसमाने तलवार हातात घेतली आहे. हि माहीती देवरी पोलिसांना मिळताच सपोनि,जाधव पो.शि. पातोडे 365,मपोशि. 1272, चापोहवा. 569 सह डायल 1 12 गाडी  न्यू हायवे धाबा, देवरी येथे दाखल झाले.  तेथे पोहोचताच दोघाचे भांडण सोडवुन तलवार हातात घेतलेल्या व्यक्तीला ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता पोलिसांनी विचारले असता त्यातील ऐकाचे नाव  नाव पाडुरंग हरिभाऊ पोटफोडे तर दुसर्यांचे नाव भरत बळीराम तांबे असल्यांचे त्यानीं सांगीतले .

तलवार हातात असणान्या ईसमाकडून दोन पंचा समक्ष तलवार जप्त करत , पोलिसांनी सदर तलवार ची मोजणी केली असता मुठे पासुन टोकापर्यंत तलवारची लांबी 73 सेंटीमीटर असुन मुठे ची लांबी 15 सेंटीमीटर असुन पात्याची रुंदी 4 सेटीमीटर असुन एका भागाला धार लागलेली लोखंडी तलवार असुन किंमती अंदाजे 300/- रु. ची पोलिसांना समजुन आली. सदर दोन्ही ईसम हे सार्वजनिक स्थळी एकमेकांसोबत शिवीगाळ करुन झुंज करतांनी मिळुन आल्याने तसेच पांडुरंग हरिभाउ पोटफोडे याचे हातात तलवार असल्याने त्याच्यासोबत भांडण करणारा ईसम नामे-भरत बळीराम तांबे  यांना ताब्यात घेवुन ग्रामीण रुग्णालय देवरी येथे नेऊन त्यांची वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे तपासनी करन्यात आली ज्यात  वैद्यकीय अधिकारी यांनी दोन्ही ईसम हे दारुच्या नशेत आहेत असा अभिप्राय दिल्याने, आरोपी पांडुरंग हरिभाऊ पोटफोडे व भरत बळीराम तांबे  यांच्या विरुद्ध कलम 4,25 शस्व अधिनियम, सहकलम 194(2) भारतीय न्याय सहिता, सहकलम- 85(1) म.दा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें