दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून नदी – नाल्यानां पूर आल्याने जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाले आहे. देवरी उपविभागाला पावसाचा सर्वाधिक तडाका बसला आहे.
गोंदिया ( देवरी ) ; दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून पूर आल्याने अनेक मार्ग बंद झाले आहेत. देवरी उपविभागाला पावसाचा सर्वाधिक तडाका बसला आहे. बहुतांश नद्या दुथडी भरून वाहत असल्याने इशारा पातळीजवळ पोहोचल्या असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
देवरी उपविभागाला दरवर्षी पावसामुळे मोठे नुकसान झेलावे लागते. यंदाही जुलैच्या पहिल्याच आठवड्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे देवरी उपविभागातील अनेक मार्गावरील रहदारी बंद झाली आहे. सोमवार रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने पूरस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्हे आहे. सोबतच आज शिरपुर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु होणार असल्याने वाघ नदीच्या पातळीत वाढ होनार आहे. त्यामुळे आणखी काही मार्ग बंद होन्याची शक्यता आहे.
खबरदारी म्हणून तालुका व जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या चमूला तयारीची सूचना देण्यात आली आहे. पावसाचा सर्वाधिक तडाखा देवरी तालुक्याला बसलेला आहे. शिरपुर धरन देखील भरल्याने विसर्ग सुरू होण्याची सभावना आहे. यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उपविभागीयअधिकारी यांनी बैठक घेत पूरस्थितीचा आढावा घेतला असून आपत्ती निवारणासाठी प्रशासनाला सूचना केल्या आहेत.
घाबरू नका, सतर्क राहा –
देवरी उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड यांनी उपविभागा अंतर्गत सुरु असलेल्या मुसळधार पावसासोबतच शिरपुर धरणात सतत वाढ होत असल्यामुळे वाघ नदीत पाण्याचा विसर्ग होण्याची संभावना वर्तवली आहे. यापार्श्वभूमीवर, उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड यांनी नागरिकांना घाबरू नका, पण सतर्क राहा असे आवाहन करत नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेची उपाययोजना राबविण्याचे आदेश आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला दिले आहेत. पूलावरून पाणी वाहत असल्यास तिथे मोटारसायकलने जाणे अत्यंत धोकादायक आहे. नागरिकांनी अशा ठिकाणी जाऊ नये, तसेच नदी प्रवाह पाहण्यासाठी पर्यटन व सेल्फी घेण्याचे प्रकार पूर्णतः टाळण्याचेही आवाहनही त्यांनी केले आहे. पोलीस विभागाने धोकादायक भागांमध्ये बॅरिकेटिंग करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
