आमदार संजय पुराम यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी निवडली आदिवासी आश्रमशाळा..
गोंदिया ( देवरी ) : गोंदिया जिल्हयातील 11 शासकीय व 23 अनुदानित अश्या सर्व आठही तालुक्यातील आश्रमशाळांचा प्रवेशोत्सव आज रोजी पार पाडला. यामध्ये नवीन प्रवेशीत मुलांना मोठठा गाजावाजा करत बैलगाडीतून मिरवणुक, काहि ठिकाणी मुलांना भेट वस्तू देत तसेच त्यांना पहिल्या दिवशी पाठय-पुस्तके, शालेय उपयोगी साहित्य वाटप याप्रकारे शालेय व्यवस्थापन समीतीच्या तसेच जिल्ह्यातील अनेक मान्यवारांचे उपस्थीतीमध्ये गोंदिया जिल्हयातील सर्व आश्रमशाळांमध्ये प्रवेशोत्सव अतिशय दिमाखात पार पडला. या प्रवेशोत्सवाचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर गोंदिया मधील आमगांव-देवरी मतदार संघाचे आमदार मा.संजयजी पुराम यांनी पुराडा येथील आश्रमशाळेमध्ये त्यांच्या इयत्ता 8 वी मधील मुलीचा प्रवेश एका खाजगी शाळेत असतांना या शैक्षणिक वर्षापासून त्यांनी मुलीचा प्रवेश पुराडा येथील शासकीय आश्रमशाळेत केला. हा खरोखरच आदिवासी समाजासमोर एक वेगळयाने त्यांनी आदर्श निर्माण केल्याचे आपण म्हणू शकतो. त्यांचा मुलगा सुध्दा आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिकलेला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलीला आदिवासी शाळेमध्ये प्रवेशित केले. आदिवासी आश्रमशाळेमध्ये पण चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळत आहे हे याचे फलित म्हणावे लागेल.
2024-25 वर्षामध्ये आदिवासी आश्रमशांळामध्ये 4211 इतके प्रवेश होते. या नविन 2025-26 च्या शैक्षणीक सत्रामध्ये आदिवासी आश्रमशाळांमध्ये साधारणत: 964 च्या आसपास प्रवेशांची वृध्दी होणार आहे. त्यामुळे एकूण विदयार्थी संख्या पाच हजार च्या पुढे जाईल असे दिसून येते. या अनुषंगाने आदिवासी आश्रमशाळांमधील प्रवेश वाढविण्याच्या अनुषंगाने मा.ना.डॉ.प्रा.अशोकजी उईके मंत्री आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य, आदिवासी विकास विभागाचे मा.सचिव विजयजी वाघमारे, मा.लिना बन्सोड मॅडम, आयुक्त आदिवासी विकास विभाग तसेच मा.आयुषी सिंग, अप्पर आयुक्त नागपूर यांनी आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थी प्रवेश वाढविण्याबाबत विशेष सूचना दिलेल्या आहेत.याबाबत यावर्षी प्रथमच विशेष अभियान या अनुषंगाने राबविले होते.
आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी समूदायासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आदिवासी पालकांपर्यत पोहचविण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या कार्यवाही करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. त्यामुळे या वर्षी आदिवासी आश्रमशाळांमध्ये प्रवेश वाढल्याचे दिसून येते.
त्याचबरोबर शैक्षणीक सत्र 2024-25 मध्ये प्रकल्प कार्यालयाकडून आदिवासी मुलांच्या कला गुणांना वाव देणे तसेच त्यांना त्यांची शैक्षणीक गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले होते. त्याचाही विद्यार्थी प्रवेश वाढीमध्ये फायदा झाल्याचे दिसून येते यामध्ये विशेष करून समर कॅम्पचे आयोजन, त्यामध्ये मुलांनी आपल्या कला गुणांचे चांगल्या पध्दतीने प्रदर्शन केले. त्याच बरोबर NEET/JEE/CET प्रशिक्षण सत्र आयोजन, यामध्ये साधारण 22 मुलांनी सीईटी मध्ये चांगले गुण प्राप्त केले आहेत. त्यांना निश्चितच चांगल्या उच्च शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश मिळण्याची संधी निर्माण झालेली आहे. तसेच चांगले खेळाडू तयार करण्याच्या अनुषंगानेही उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. आदिवासी पालकांना खाजगी शाळांच्या प्रमाणे मुलांचे शैक्षणीक प्रगती कळावी यासाठी Sms, Whatus app मॅसेजेस पाठविण्याची सुविधा प्रकल्प कार्यालयाने तयार केलेले आहे. तसेच उच्च शिक्षणधारण विद्यार्थ्याना लॅपटॉप देणे,इ. 5 वी, 8 वी वर्गाच्या स्कॉलरशिपसाठी यावर्षी विनोबा भावे प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.
प्रवेशउत्सव दिवशी सर्व आश्रमशाळेमध्ये तहसीलदार यांचे सहकार्याने धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियांनांतर्गत मुलांचे आधार अपडेशन चे कॅम्प आयोजन करण्यात आलेले होते.या सर्व बाबी पाहता शासकीय आश्रमशाळेतील शिक्षणाचा दर्जा वाढण्यास मदत होणार आहे.
आदिवासी विद्यार्थ्यानी आश्रमशाळेत प्रवेश घेवून चांगल्या दर्जाचे शिक्षण घ्यावे,पालकांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन देवरी प्रकल्प अधिकारी उमेश काशिद यांनी केले आहे.
