गोंदिया जिल्हयातील नागरिकांचे सुविधेकरीता गोंदिया जिल्हा पोलीस दलाची “नविन वेब साईट कार्यान्वित”

नागरीकांना आता थेट  ऑनलाईन तक्रार करून तक्रारीचे करता येणार निवारण

गोंदिया : पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, यांचे संकल्पनेतून आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री नित्यांनंद झा, कॅम्प देवरी यांचे मार्गदर्शनात गोंदिया जिल्हा पोलीस दलाची नविन वेबसाईट कार्यान्वित करण्यात आलेली आहे ….सदर वेब साईटवर गोंदिया जिल्हा पोलीस दलाची अद्यावत माहीती तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन, सर्व शाखा यांची माहीती अद्यावत उपलब्ध करण्यात आली असुन…. नागरीकांना पोलीस विभागाशी संबंधीत कामाकरीता आवश्यक असणारी माहीती याद्वारे मिळणार आहे…

पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री.. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यांनंद झा, यांचे निर्देशानुसार गोंदिया जिल्ह्यातील नागरीकांना या वेबसाईटवर *”सिटीझन कॉर्नर” या टॅबमध्ये* प्रथमच ऑनलाईन कंप्लेट ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे….. त्यांचेसोबत घडलेल्या घटनेविषयी तक्रार करण्याकरीता …….यावर केलेल्या तक्रारीवर संबंधीत पोलीस स्टेशन तर्फे कारवाई होणार आहे. त्यासोबतच कोणत्या नागरीकाने काय तक्रार केली व त्या तक्रारीवर संबंधीत पोलीस स्टेशन ने काय कारवाई केली हे थेट पोलीस अधीक्षक यांना समजणार आहे….. व ते याबाबत नियमीत आढावा घेणार आहेत.

नागरीकांना वेबसाईटवर महिलांविषयी तक्रार, मुलांविषयी तक्रार, गुन्हे विषयक तक्रार, आर्थिक फसवणुकीची तक्रार, सायबर विषयी तक्रार, संपती विषयी तक्रार, मोबाईल हरविल्याची तक्रार, सायबर फसवणुक झाल्याची तक्रार तसेच भाडेकरुची माहिती व ईतर तक्रारी करण्याची सुविधा नागरीकांसाठी सदर वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

गोंदिया जिल्हयातील नागरीकांना याद्वारे असे आवाहन करण्यात येत आहे की,….त्यांनी कार्यान्वित करण्यात आलेल्या गोंदिया जिल्हा पोलीस नवीन वेबसाईट चा सुलभ जास्तीत जास्त वापर करून आपल्या तक्रारीचे निरसन करून घ्यावे….. गोंदिया जिल्हा पोलीस दल जिल्ह्यातील नागरीकांच्या समस्या सोडविण्याकरीता, सेवेकरीता सदैव प्रयत्नशील तत्पर आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें