गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम व हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत बाईक रॅली चे आयोजन

गोंदिया ( देवरी ) : गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस स्टेशन देवरी अंतर्गत दिनांक १३ ते १८ ऑगष्ट २०२५ या कालावधी दरम्यान अंमली पदार्य विरोधी जनजागृती व हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत असुन त्या अनुषंगाने मा. श्री पोलीस अधीक्षक गोरख भामरे साहेब, यांचे मार्गदर्शनात आज दिनांक १४/०८/२०२५ रोजी दुपारी ०४.०० वा. पोलीस स्टेशन देवरी येथुन बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर लॅली ला मा. श्री अभय डोंगरे सा. अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, मा. कविता गायकवाड, उपविभागीय दंडाधिकारी सा. देवरी यांनी हिरवी झेंडी दाखवुन बाईक रॅलीची सुरुवात केली. सदर अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम बॅईक रॅलीमध्ये मा. श्री विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधीकारी सा., उपविभाग देवरी, मा. श्री उमेश काशिद सा. एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी गोंदिया, मा. श्री गणविर सा. तहसिलदार तहसिल कार्यालय देवरी, पोलीस निरीक्षक प्रविण डांगे सा. पोलीस स्टेशन देवरी १५० ते २०० पोलीस अधिकारी व अंमलदार देवरी शहरातील सर्व शाखांचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस पाटील व ग्रामस्थ यांनी सहभाग घेतला.

सदर बाईक रॅली पोलीस स्टेशन देवरी येथुन सुरुवात करुन, चिचगड रोड, मुख्य बाजारपेठ, दुर्गाचौक, कारगील चौक, पंचशिल चौक, मसक-या चौक, संजय नगर, गोंडवाना नगर, एमआयडीसी परिसर विविध मार्गाने फिरवुन सदर बाईक रॅली चा समारोप पोलीस स्टेशन देवरी येथे समारोप करण्यात आला. याव्दारे नशामुक्त समाज घडविणेकरीता गोंदिया जिल्हा पोलीस दलाकडुन जनजागृती करण्यात आली.

मा. श्री पोलीस अधीक्षक गोरख भामरे साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री अभय डोंगरे सा. अपर पोलीस अधिक्षक सा. गोंदिया, कॅम्प देवरी, मा. श्री विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधीकारी सा., उपविभाग देवरी, पोलीस निरीक्षक प्रविण डांगे सा. पोलीस स्टेशन देवरी यांनी सदर बाईक रॅलीचे यशस्वी नियोजन केले.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें