गोंदिया जिल्ह्यातील प्रतापगडावर महाशिवरात्री निमित्त उसळनार भक्तांचा महापूर

हिंदू-मुस्लीम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या प्रतापगडावर महाशिवरात्री पर्वावर लाखों भाविक दर्शन घेन्यास येतात. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून वृध्द महिला-पुरुष, युवक-युवती व बालक ‘महादेवा जातो गा’ चा गजर करीत भाविक गर्दी करीत असतात.

यात्रे दरम्यान चोख बंदोबस्त आणि सुविधा…

गोंदिया : हिंदू-मुस्लीम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या प्रतापगडावर महाशिवरात्री पर्वावर लाखों भाविकांची गर्दी होते. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आबालवृध्द महिला-पुरुष, युवक-युवती व बालकांनी ‘महादेवा जातो गा’ चा गजर करीत भाविक गर्दी करीत असतात. ही यात्रा सलग पाच दिवस चालत असुन यंदा  येथील गर्दीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महाशिवरात्री पर्वावर गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे मोठी यात्रा भरते.
मांगल्य जपणारा, आनंद देणारा व बंधूभाव वाढविणार्या या उत्सवाला येथे अत्याधिक महत्व व श्रध्दा आहे. हिंदू समाजबांधव महादेव पहाडीवर तर मुस्लिम बांधव ख्वाजा उस्मान गनी हारुनी बाबांचे मोठ्या भक्तीभावाने दर्शन घेतात. हातात त्रिशूल व मुखात “महादेवा जातो गा” असा गजर करीत भाविक येथे मोठ्या प्रमानात गर्दी करतात.

ग्रामपंचायतकडून सोयी सुविधा…

भाविक रस्त्यावर नारळ फोडतात. कवच रस्त्यावर फेकतात ते इतर भाविकांच्या त्रासदायक ठरुन इजा होऊ नये, तसेच अगरबत्ती, बेल, फुल व कापूर जाळण्यासाठी ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनातर्फे पहिली पायरी व वरच्या मंदिरात देवकुंडाची व्यवस्था करण्यात येते. वरच्या मंदिरात दर्शन घेणारे व दर्शन घेऊन परत येणाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्गाची व्यवस्था या यात्रे दरम्यान करण्यात येते.


आरोग्य शिबिराची व्यवस्था…

यात्रे दरम्यान आरोग्य विभागाच्या वतीने भाविकांच्या आरोग्य तपासणीसाठी अनेक ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी यांचे देखरेखी खाली आरोग्य तपासणी केंद्र व रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात येते. ठिकठिकाणी पेयजल व्यवस्था तसेच अनुचित प्रकार टाळण्यासाठी तालुका प्रशासनातर्फे सीसीटीव्ही कॅमेर्याची व्यवस्था करण्यात येते. एस.टी. महामंडळाच्या भंडारा, साकोली, गोंदिया व तिरोडा बसस्थानकावरुन भाविकांची वाहतूक सुविधा यात्रे दरम्यान  करुन देण्यात येते.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें