गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात 85 वर्षावरील वयोवृध्द नागरिक व 40 टक्केपेक्षा अधिक दिव्यांग असलेल्या ज्या मतदारांनी गृह मतदानाची सुविधा मिळण्याबाबत नोंदणी केली होती त्यांच्यासाठी मतदारसंघ निहाय विविध पथके नमून संबंधित मतदाराच्या घरी जावून गृह मतदान घेण्यात आले. जिल्ह्यात 85 वर्षावरील 424 वयोवृध्द नागरिकांनी व 40 टक्केपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या 508 अशा एकूण 508 मतदारांनी गृह मतदानाची नोंदणी केली होती. यापैकी 85 वर्षावरील 400 वयोवृध्द नागरिकांनी व 81 दिव्यांग व्यक्ती अशा एकूण 481 मतदारांनी गृह मतदान करुन या सुविधेचा लाभ घेतला, अशी माहिती निवडणूक विभागाकडून प्राप्त झालेली आहे.
मतदारसंघ निहाय गृह मतदानासाठी नोंदणी केलेले मतदार व गृह मतदान केलेल्या मतदारांची माहिती पुढील प्रमाणे आहे.

