अमोल तलांजे याला ५ वर्षे सश्रम कारावासासह एकूण १२,००० रुपयांचा दंड
गोंदिया : गोंदिया येथील विशेष सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात आरोपी अमोल रामेश्वर तलांजे (वय ३०, रा. बोळडे/करड, ता. अर्जुनी/मोर, जि. गोंदिया) याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणात न्यायालयाने भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६(२)(एल) अंतर्गत आजीवन कारावास व १०,००० रुपयांचा दंड, तसेच कलम ४५२ अंतर्गत ५ वर्षे सश्रम कारावास व २,००० रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास अतिरिक्त कारावासाची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे.
प्रकरणानुसार, आरोपीने पीडितेच्या घरात जबरदस्ती घुसून तिच्यावर अत्याचार केला होता. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून पुरावे गोळा केले व न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
सरकारी वकिलांनी प्रभावी युक्तिवाद करत १२ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. त्यानंतर न्यायालयाने आरोपी दोषी ठरवत कडक शिक्षा सुनावली.
या प्रकरणात पोलीस विभागाने केलेल्या तपासकार्याचेही कौतुक करण्यात आले आहे.









