गोंदिया : रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत गोंदिया येथे. बुधवारी हेल्मेट वाटपचे आयोजन करण्यात आले होते. या मोटार सायकल हेल्मेट वाटप कार्यक्रमामध्ये महिला व पुरुष अशा शेकडो मोटार सायकल चालकांनी सहभागी झाले होते.
रस्ता सुरक्षा ही काळाची गरज आहे. जनसामान्यांपर्यंत रस्ता सुरक्षते विषयी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते. गोंदिया जिल्ह्यातील वाढत असलेली वाहनसंख्या पाहता रस्ता सुरक्षतेविषयी जनजागृती व्हावी यासाठी बुधवारी (दि.22) मोटार सायकल हेल्मेट वाटप आयोजन करण्यात आले होते. गोंदियाच्या उपलप्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करन्यात आले होते.
हेल्मेट वाटप सुरुवात करण्यापूर्वी पुष्पा भाऊ चे रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत नाट्य कला प्रदर्शीत करन्यात आले. विशेषता रस्त्यावरुन येणा-या बिना हेल्मेट वाहन चालविणा-या मोटार सायकल स्वारांना कार्यक्रमाप्रसंगी हेल्मेट वाटप करत हेल्मेट वापरण्याचे आवाहन करण्यात आले.तसेच सर्व वाहन चालकांना रस्ता सुरक्षतेबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलिस अधिक्षक गोरख भामरे, नरेश लभाने , समिर महेर, नागेश भाष्कर उप प्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदियाचे मोटार वाहन अधिकारी राजेन्द्रं केसरकर , ओमप्रकाश सय्याम मटार वाहन निरीक्षक , अनिकेत टाकळकर, सोनाली डोंगरवार, दाऊद मुश्रीफ , अनुप नागदेवे , अमित रौंदल , स्वप्नील कुरसुंगे , राजेन्द्रं दराडे, राहुल चाकने , राहुल सपकाळ , मनोज शिंदे, प्रशाद शुर्वसे आणि वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
