गोंदिया वनविभागांतर्गत अर्जुनी मोरगांव वनपरिक्षेत्रात वन्यप्राणी बिबटचा मृत्यू

गोंदिया ( अर्जुनी मोरगांव ) :  वनविभागातील अर्जुनी मोर वनपरिक्षेत्रांतर्गत सहवनक्षेत्र बोंडगांव नियतक्षेत्र बोदरा येथील मौजा सोनेगांव झुडपी जंगल कक्ष क्रमांक 1388 येथे दिनांक 22/05/2025 रोजी गस्ती करीता असतांना कु. आर. एस. भोगे, क्षेत्र सहाय्यक, बोंडगांव यांना वन्यप्राणी बिबट मृताअवस्थेत आढळून आले. सदर घटनेची माहिती प्राप्त होताच वनाधिकारी तसेच डॉ. उज्वल बावनथडे, पशुधन विकास अधिकारी, अर्जुनी मोर यांचेसह मौक्यावर उपस्थित होवून मौका स्थळी मृत वन्यप्राणी बिबटची पाहणी केली असता, मृत बिबटाचे मानेवर व दोन्ही पयावर इतर वन्यप्राण्याचे नखांचे तसेच दातांचे जखमांचे निशान आढळून आले. तसेच सदर घटना स्थळी वाघाच्या अधिवास असल्याचे आढळून आले यावरुन सदर बिबटयाचा मृत्यू हा वाघाच्या हल्ल्यात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सदर घटने बाबत माहिती प्राप्त होताच श्री. अविनाश मेश्राम, प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी, नवेगांवबांध, डॉ. घनश्याम ठोंबरे, वनपरिक्षेत्र आधिकारी, संरक्षण पथक-2 नवेगांव बांध, श्री. एम. के. क्षिरसागर, नायब तहसिलदार, अर्जुनी मोर, डॉ. वामन डपेटवार, सहाय्यक आयुक्त पंचायत समिती अर्जुनी/मोर, डॉ. उज्वल बावनथडे, पशुधन विकास अधिकारी, अर्जुनी मोर, तसेच मानद वन्यजीव रक्षक श्री. मुकुंद धुर्वे व श्री. रुपेश निंबातें यांचे उपस्थितीत मृत बिबटच्या शवाची तपासणी करण्यात आली व सदर मृत बिबटाच्या मृतदेहास अर्जुनी मोर, आगार येथे हलविण्यात येवून सदर ठिकाणी पशुधन विकास अधिकारी, अर्जुनी मोर यांचेकडुन मृत बिबटाचे शव विच्छेदन करण्यात आले व मृत बिबटच्या अवयवाचे नमुने सिलबंद करुन बना अधिकारी व क्षेत्रीय वनकर्मचारी यांचे उपस्थित मृत बिबटचे शव जाळून नष्ट करण्यात आले.

सदर बिबट वन्यप्राण्याचे मृत्यू प्रकरणी वनगुन्हा जारी करण्यात आलेला असून, उपवनसंरक्षक गोंदिया वनविभाग गोदिया यांचे मार्गदर्शनाखाली प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी, नवेगांव बांध हे पुढील तपास करीत आहेत.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें