■देवरी येथील न्यायालयाच्या नुतन ईमारतीच्या
उद्घाटन प्रसंगी तालुका बार असोशिएशन यांना एक लक्ष रूपयाचे कायम मुदती ठेव प्रमाणपत्र केले दान.
—————————-
देवरी : देवरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालच्या नुतन ईमारतीचे उद्घाटन शनीवार (ता.८ फेब्रुवारी)रोजी सर्वोच्च न्यायालय नई दिल्ली चे
न्यायमुर्ती भुषण रा. गवई यांच्या शुभ हस्ते पार पडले.
यावेळी देवरी येथील जेष्ठ अधिवक्ता, राष्ट्र भाषा रत्न, एम.ए.(डॉ. आंबेडकर विचारधारा), एल.एल.बी., पी.एच.डी. ग्रंथमित्र (महाराष्ट्र शासन) मुंबई तथा डॉ. आंबेडकर फेलोशिप (दिल्ली पुरस्काराने सन्मानित एड. श्रावण उके यांनी देवरी येथील वकिल संघास (तालुका बार असोशिएशन) यांना एक लक्ष रूपयाचे कायम मुदती ठेव प्रमाणपत्र दान केले.
या प्रित्यर्थ एड.डॉ. श्रावण उके व त्यांची पत्नी शारदा श्रावण उके यांचा शाल श्रीफळ व सत्कारमुर्ती स्मृती चिन्ह प्रदान करून मान्यवर न्यायाधिशांच्या व गोंदियाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश राजेश न. जोशी यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले..
या प्रसंगी हे कार्यक्रम मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अशोक आराधे, मुंबई उच्च न्यायालय चे न्यायमुर्ती नितीन सांबरे यांच्या सन्मानिय उपस्थिती आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश महेंद्र चांदवाणी यांच्या अध्यक्षतेखाली आणि गोंदियाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश राजेश न. जोशी यांच्या उपस्थितीत तसेच देवरी येथील कनिष्ठ स्तर दिवानी न्यायाधिश व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी सुलभा चरडे तसेच देवरी तालुका वकील संघाचे अध्यक्ष एड. प्रशांत संगिडवार इत्यादीच्या प्रमुख उपस्थिती पार पडले.
या उद्घाटन सोहळ्याचे सुत्र संचालन न्याय. प्राजक्ता ढाणे व तेजस्वी गवई यांनी केले.#
(टिप :- या बातमी सोबत एड. डॉ. श्रावण उके व त्यांच्यी पत्नी शारदा उके हे। देवरी येथील वकिल संघास (तालुका बार असोशिएशन) यांना एक लक्ष रूपयाचे कायम मुदती ठेव प्रमाणपत्र दान करतांनीची फोटो पाठविली आहे.
