तालुक्यातील जि.प. शाळेच्या इमारती जीर्ण….
देवरी तालुक्यातील मासूलकसा येथील जि.प. प्राथमिक शाळेची स्लॅब कोसळल्यारची घटना ताजी असताना शनिवारी (दि. २७ ) देवरी तालुक्यातील चिचगड येथील जि.प. प्राथमिक शाळेच्या स्लॅब व भिंत कोसळल्याची घटना सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास घडली.
गोंदिया ( देवरी ) ; तालूक्यातील मासूलकसा येथील जि.प. प्राथमिक शाळेची स्लॅब कोसळल्याची घटना ताजी असताना शनिवारी (दि.२७ ) तालुक्यातीलच चिचगड येथील जि.प. प्राथमिक शाळेच्या स्लॅंब व भिंत कोसळल्याची घटना सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने याच वेळेत विद्यार्थी खेळन्यासाठी वर्गखोली बाहेर गेले असल्याने मोठी जीवितहानी टळली. तीन दिवसात लागपाठोपोठ घडलेल्या दोन घटनांमुळे देवरी तालुक्यातील जि.प. शाळांच्या जीर्ण इमारतींचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, चिचगड येथे जि.प. प्राथमिक शाळा असून पहिली ते सातवी पर्यंत वर्गअसून एकूण २०३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शनिवार असल्याने शाळा सकाळ पाळीत भरवली गेली होती. शनिवारी (दि.२७) सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास विद्यार्थी खेळन्यासाठी शाळेच्या आवारात बसले होते. याच दरम्यान शाळेच्या ऐका वर्गखोलीचे स्लॅँब व भिंत कोसळून पडले. मोठा आवाज झाल्याने शिक्षकांनी वर्गखोलीत जावून पाहिले असता स्लॅब व भितं यांचा मोठा भाग पडलेला आढळला. त्यानंतर लगेच त्यांनी विद्यार्थ्यांना त्या वर्गखोलीत नबसण्याची सूचना दिली. तसेच केंद्रप्रमख व देवरी पंचायतसमितीच्या गटशिक्षणाधिकारी यांना याची माहिती दिली.दरम्यान या प्रकारामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बांधकामावर प्रश्नचिन्ह…
चिचगड येथील जि.प.शाळेच्या इमारतीचे बांधकाम दर्जेदार न झाल्याने काही वर्षातच स्लॅब व भितं कोसळल्याने इमारत बांधकाम आणि त्यात वापरलेल्या साहित्यावर सुध्दा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदर विषयात अनेकदा निवेदन देऊनही शाळेच्या ईमारतीकडे दुर्लक्ष केले गेले. दुरुसती करनाच्या नावाने लाखोरुपयांची हेराफेरी केली जात असल्याचा आरोप विद्यार्थांच्या पालकांनी केला आहे.
गुणवत्तेकडे दुर्लक्ष….
इमारतींचे बांधकाम करताना जि.प.शिक्षण विभाग आणि बांधकाम विभागाचे सुध्दा लक्ष नाही. केवळ कंत्राट देऊन मोकळे होण्याच्या भूमिकेमुळे जि.प.शाळेच्या इमारत बांधकामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. शाळेच्या इमारतीची दुरूस्ती व नविनीकरण करण्याबाबत ग्रामपंचायतला, माजी महिला बालकल्यान सभापती, पंचायत समिती जि.प.गोंदिया , जि.प, सदस्य यानां पत्र दिले गेले होते. मात्र अद्यापही दुरूस्तीकरन करण्यात आले नाही. शाळेची इमारत ज़ुनी व जिर्ण झाली असूनही नविनीकरन करन्यात आली नाही.
प्रतिक्रीया…
शाळेच्या इमारतीचे बांधकाम जुने व निकृष्ट केले गेले होते. इमारत जीर्ण देखील झालेली होती. निकृष्ट बांधकामामुळे स्लॅब भिंत कोसळल्याची माहिती जि.प.शिक्षणविभागाला देण्यात आली. परंतु अजुनही विद्यार्थ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाय योजना शिक्षण विभातर्फे करण्यात आलेली नाही.
– योगेश देशमुख, गावकरी.









