छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्याला जगण्यासाठी प्रेरणा देणारे एक उर्जाकेंद्र होय

प्रसिध्द युवा प्रबोधकार डॉ.प्रशांत ठाकरे यांचे प्रतिपादन.
■ देवरी येथील छत्रपती शिवाजी संकुलनात शिव जयंती साजरी.

गोंदिया ( देवरी ) : ‘धर्मचिकित्सक, सर्वांगस्पर्शी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्याला जगण्यासाठी प्रेरणा देणारे एक उर्जाकेंद्र होय. त्यांच्याप्रमाणे आपण आपले तारुण्य, संपत्ती, विद्वता ही समाजासाठी, राष्ट्रासाठी खर्च करावी.’ असे प्रतिपादन   प्रसिध्द युवा प्रबोधकार डॉ. प्रशांत महाराज ठाकरे यांनी. स्थानिक छत्रपती शिवाजी संकुलमध्ये १९ फेब्रुवारी रोज बुधवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सव सोहळ्यानिमित्तः आयोजित कार्यक्रमाप्रसंगी  केले.
             दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा “छत्रपती शिवाजी संकुल उत्सव समिती’ च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा १९ फेब्रुवारी रोजी सी.एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या भव्य आवारामध्ये आयोजित करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे उद्घाटन  या क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते तसेच  जि.प. गोंदिया चे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ़ पूणाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून पूजन व ध्वजारोहण  भा.ज.पा.चे जिल्हा संपर्क प्रमुख विरेंद्र अंजनकर यांचे शुभहस्ते पार पडले. याप्रसंगी  अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार  इंजि. राजकुमार बडोले तर आमंत्रित प्रमुख वक्ते व मार्गदर्शक   प्रसिद्ध युवा प्रबोधनकार तथा पुणे  विद्यापीठ चे गोल्ड मेडलिस्ट       
डॉ. प्रशांत महाराज ठाकरे आणि प्रमुख अतिथी म्हणून
देवरी पं. स.चे सभापती अनिल बिसेन,देवरीचे नगराध्यक्ष संजू ऊईके,  कृष्णा          सहयोगी तंत्र शिक्षण संस्था, देवरी चे अध्यक्ष झामसिंग            येरणे, उपाध्यक्ष  डॉ. सुनिलकुमार येरणे,  सचिव अनिलकुमार येरणे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी तथा अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.
           याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार संजय पुराम यांनी, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कामापैकी एक जरी काम आपण स्विकारले तर त्यांच्या जयंतीला अर्थ राहील.’ असे प्रतिपादन केले.तसेच          कार्यक्रमाचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून ‘आजच्या पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र समजून ते आत्मसात केले तरच त्यांची जयंती सार्थक ठरेल.’ असे प्रतिपादन केले.
          या कार्यक्रमा दरम्यान गोंदियाचे  सामाजिक कार्यकर्त्या,  सविता तुरकर,  वडेगावचे माजी सरपंच तथा  ग्राम तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजकुमार रहांगडाले,           भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन व देवरी तालुका महिला संघटन उपाध्यक्ष,कु. सुनंदा भुरे आणि देवरी येथील धुकेश्वरी मंदीर ट्रस्ट समिती चे अध्यक्ष  एड. प्रशांत संगीडवार व सचिव, सुशिल शेन्द्र  या सत्कारमूर्तीचे स्वागत व सत्कार तसेच वर्ग १० वी व १२ वी मध्ये दहावी बोर्डाच्या परीक्षेत तालुक्यांतून प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकासह स्वागत व सत्कार करण्यात आला.
            यावेळी छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर, छत्रपती शिवाजी हायस्कूल, सी.एस. इंग्लिश पब्लिक स्कूल, स्वामी रामकृष्ण आदीवासी आश्रमशाळा मकरधोकडा व खडकी/बाम्हणी येथील तसेच फार्मसी कॉलेज व पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित वेशभूषा सादर केली.
           या कार्यक्रमाचे – प्रास्ताविक अनिलकुमार येरणे यांनी केले तर  उपस्थितांचे आभार  डॉ. सुनिलकुमार येरणे यांनी मानले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस.टी. मेश्राम, चंद्रशेखर बडवाईक व जायस्वाल मॅडम यांनी केले. अशा रितीने “छत्रपती शिवाजी ‘संकुलमध्ये” छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव सोहळा थाटात संपन्न झाला.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें