२ रेडे व १५ म्हसींची सुटका…
छत्तीसगड मार्गे महाराष्ट्रात प्रवेश करनार्या सिरपुर सीमा शुल्क तपासनी नाक्याजवळ देवरी पोलिसानीं आज (दि.२५) सकाळी ६.१५ वाजता गस्ती दरम्यान अवैध जनावरे वाहुन नेणार्या वाहनांवर कारवाही केली.
गोंदिया ( देवरी ) ; छत्तीसगड मार्गे सिरपुर सीमा शुल्क तपासनी नाका ओलांडुन देवरी कडे येत असतानीं वाहन क्र. CG-०४/PE- ६५८२ कथ्या रंगाचे अशोक लेलॅंड मालवाहक गाडी च्या मालकाला गस्ती दरम्यान देवरी पोलिसांनी विचारना केली असता चालक नामे शैलेन्द्र चरनुदा भारती, वय २६ वर्ष रा. पथर्रा वार्ड नं. ०४,पो. जंजगीरी,ता. धमदा, जि. दुर्ग, थाना-भिलाई चरोदा क्र.०३ त्याच्या ताब्यातील वाहनात मर्यादेपेक्षा जास्त काळे जनावरे एकुण १७ नग लहान मोठे रेडे व म्हैस, वाहनात कोंबून भरून , रस्सीबांधुन, त्यांना उभे राहण्यासाठी पुरेशी जागा न देता, त्यांची चारा पाण्याची व्यवस्था न करता त्यांना दुख व यातना देवून निर्दयतीची वागणूक देवून वाहतूक करतांनी मिळून आले.
देवरी पोलिसांनी वाहनचालक व वाहन ताब्यात घेत त्यांच्या विरुद्ध कलम ११(१)(ड), (ई), (फ), प्राणी ।प्र. अधी. १९६० अन्वये गुन्हा नोंद करत १३ लक्ष १० हज़ार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवरी पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रविण डांगे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक राठोड, चा.पो.ना. पंकज पारधी, पो.सी. खांडेकर , पो.हवा. बडोले यांनी ही कारवाही केली.
विशेषता, सहाय्यक पोलिस निरीक्षक राठोड, चा.पो.ना. पंकज पारधी, पो.सी. खांडेकर, पो.हवा. बडोले यांचे पथक २४ जानेवारीला रात्री गस्ती ला होते. दरम्यान २५ जानेवारीच्या पहाटे सव्वा सहा वाजताच्या सुमारास छत्तीसगडकडुन एक ट्रक सिरपुर सीमा शुल्क तपासनी नाक्यावरुन देवरी कडील मार्गावर येत असल्याची माहिती मिळाली. सदर ट्रकमध्ये रेडे व म्हैस असल्याची माहिती या पथकाला मिळताच देवरी पोलिसांच्या पथकाने ट्रकचा पाठलाग सुरु केला. पोलीसानीं ट्रक थांबवत ट्रकची तपासणी केली असता त्यात २ रेडे १५ म्हैस असल्याचे आढळून आले. ट्रकच्या क्रमांकावरून माहिती घेतली असता सदर ट्रक छत्तीसकड येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी देवरी पोलिसांनी कारवाई सुरु केली असुन वाहन चालक व जनावरे ताब्यात घेतली आहेत.









