जिल्हाधिकारी कार्यालय जवळ गोंदिया येथे दाखल झालेल्या वाघास वन विभागा द्वारे जेरबंद करण्यात आले.

गोंदिया : दिनाक ११/१०/२०२५ रोजी गोंदिया वन विभाग गोंदिया मधील वनपरिक्षेत्र गोंदिया अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया जवळ वन्यप्राणी वाघ दिसून आल्याची माहिती प्राप्त होताच वनविभागाची संपूर्ण चमु घटनास्थळी दाखल होवून संपूर्ण परिसरात निरीक्षण करुन वाघाचा शोध घेतला असता रात्री 12.30 वाजताच्या सुमारास सारस चौक आमगाव रोड लगत च्या खुल्या प्लाट मध्ये असल्याचे आढळून आले.

सदर वाघ मागील ७ ते 8 दिवसापासून मानवी वस्ती तसेच शेती क्षेत्रा लगत फिरत असल्याने भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेता मा. मुख्य वन्यजीव रक्षक, महाराष्ट्र राज्य यांच्या पुर्व परवानगीने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार गोंदिया वनविभागाचे जलद बचाव दल व क्षेत्रीय कर्मचारी यांचे कडुन सदर वाघास बेशुध्द करुन यशस्वीरित्या रेस्क्यू करण्यात आले. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित पशु वैद्यकीय अधिकारी यांचेकडुन वाघाची तपासणी करण्यात आली, तपासणीमध्ये वाघ सुदृढ असल्याचे निष्पन्न झाल्याने वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीने त्याला TTC नागपूर येथे स्थलातरीत करण्यात आले.

सदरची मोहीम मुख्य वन्यजीव रक्षक, महाराष्ट्र राज्य श्री. एम. एस. रेड्डी, श्रीमती श्रीलक्ष्मी ए. वनसंरक्षक (प्रादे), नागपूर वनवृत्त नागपूर व श्री. पवनकुमार आ. जोंग, उपवनसंरक्षक गोंदिया वनविभाग गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. विजय व. धांड े सहायक वनसंरक्षक (तेंदु व कॅम्पा) गोंदिया, श्री. सचिन एम. डोंगरवार सहायक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव), श्री. दिलीप कैशीक वनपरिक्षेत्र अधिकारी गोंदिया, श्री. सावन बहेकार, अध्यक्ष सेवा संस्था गोंदिया, डॉ. डी. डी. कटरे पशु वैद्यकिय अधिकारी, श्री. सिंगणजुळे पोलीस निरिक्षण्क गोंदिया, अमोल चौबे, अमित राऊत, सतिश शेंदरे, विक्रांत ब्राम्हणकर, शुभम मेश्राम, राजेश ढोक व आर. आर. टी गोंदिया तसेच पोलीस विभाग व क्षेत्रिय वन कर्मचारी यांचे सहकार्याने यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

छत्तीसगढ़ के आसमान पर बिखरेगी तिरंगे की झटा नया रायपुर में सूर्य किरण का रोमांचक एयर शो 5 नवंबर को फाइटर प्लेन मनूवर करते हुए बनाएंगे हार्ट, डायमंड, लूप, ग्रोवर, डान जैसी कई फार्मेशन नौ फाईटर प्लेन आधे घंटे तक आसमान में दिखाएंगे करतब