24 तास उलटूनही पोलिसांकडून अधिकृत माहिती नाही…
गोंदिया ; पोलीस स्टेशनच्या आवारात एका संशयित आरोपीने आत्महत्या केल्याची घटना व प्राथमिक माहिती दि.16 रोजी समोर आली आहे. मात्र या घटनेबाबत पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार सडक अर्जुनी तालुक्यातील पोलीस स्टेशन ड्रगीपार येथे एका विचित्र आणि गंभीर घटनेची चर्चा तालुक्यासह जिल्ह्यात सुरू झाली, स्थानिक पोलिसांना संशयास्पद रित्या रुगणवाहिका आढळून आली त्याची चौकशी केली असता पोलिसांना त्या रुग्णवाहिकेत शव आढळून आले. दरम्यान पोलिसांनी ती रुगणवाहिका वाहकासह पोलीस स्टेशनमध्ये आणली वाहकाची विचारपूस केल्यानंतर त्याला ताब्यात घेतले मात्र त्या रुग्णवाहिकेच्या वाहकाने पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्या केल्याची चर्चा आज संपूर्ण जिल्हात सुरू झाली आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी ठाणेदार वनारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घटनेला दुर्जोरा दिला मात्र तपास सुरू असल्यामुळे विस्तृत माहिती देऊ शकत नसल्याचे सांगितले.
सदर रुग्णवाहिका तेलंगणा राज्यातील ( हैदराबाद) येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी पोलीस ठाण्यात दाखल झाले असून घटनास्थळी सकाळपासून पंचनामा व तपास सुरू आहे. दरम्यान, आरोपीने आत्महत्या नेमकी कशी केली, त्यावेळी तो कोठडीत होता की अन्य ठिकाणी, तसेच कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली ? रुगणवाहिकेत असलेले शव होते की हत्या याबाबत अधिकृत माहिती अजून मिळालेली नाही.
शव घेऊन जाणारी रुगणवाहिका आणि त्याच्या वाहकाला कालच ता. १५ रोजी ताब्यात घेतले.पोलिसांकडून तपासांती आरोपीला ताब्यात घेण्यात आले होते. परिसरात लोकांमध्ये आअसलेल्या
चर्चेनुसार अज्ञात आरोपीने रात्रीच आत्मह्या केल्याची घटना सांगितली जाते. त्यामुळेरुरणवाहिका कुठलीरुग्णवाहिकेतील ते शव कुणाचे ? आणि वाहक कोण? २४ तास उलटूनहीयाची अजूनही पोलिसांकडून अधिकृत माहिती का? देण्यात आली नाही. इतकी मोठी गंभीरवटना घडल्यामुळे पत्रकारांकड्ून दूरध्वनीद्वारे वारंवार विचारणा करण्यात आली मात्र ती देण्यातआली नाही प्रत्यक्ष भेट देिण्याचा प्रयत्न केला असता कुणालाही आतमध्ये सोडले येत नाही.परिणामी जनतेमध्ये अधिकच शंशय निर्माण होत असून पुरावे नष्ट होण्याची शक्यता असतेत्यामुळे पोलीस प्रशासन स्वतःची चूक लपवण्याचा प्रयत्न करत आहे का ? अशी चर्चातालुक्यासह जिल्हा त्सेच राज्यात सुरू झाली आहे.









