तिकिटासाठी तारीख पे तारीख; आमगाव विधानसभा कॉंग्रेसचा ठरेना, काँग्रेसची जागा गुलदस्त्यात

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विलास चाकाटे ठाम…

गोंदिया (देवरी): विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले असताना आमगाव - देवरी मतदार संघाच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये 'तारीख पे तारीख' चा खेळ सुरू आहे. काँग्रेसने आमगाव - देवरी विधानसभा मतदार संघातील उमेदवार जाहीर केलेला नाही, तर भाजपने माजी आमदार संजय पुराम यांना तिकीट दिले आहे. आज कॉंग्रेस उमेदवार जाहीर करण्याची शक्यता होती. मात्र, उमेदवारीचा सस्पेन्स कायम आहे. तर दुसरी कडे आमगाव विधानसभा मतदार संघातुन कॉंग्रेसचा मित्र पक्ष असलेला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे देवरी तालुका अध्यक्ष विलास चाकाटे निवडणूक लढविण्याच्या आपल्या शब्दावर ठाम आहेत. आमगाव विधानसभेत कॉंग्रेसचा उमेदवार कोण याचा निर्णय अजून कॉंग्रेस लावू शकला नाही. कॉंग्रेच्या ऐकही यादीचा अजुण पर्यंत उल्लेख झालेला नाही. कॉंग्रेसकडून विधानसभेच्या उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर करण्यात येणार असल्याचे नाना पटोले यांनी बोलले आहे. आमगाव मतदारसंघात कोण उमेदवार असेल कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा आज होईल, अशी अपेक्षा होती. मात्र आजही यादी प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे आमगाव - देवरी विधानसभेत कोण कॉंग्रेसचा उमेदवार हा प्रश्न अजून सुटलेला नाही हेच संकेत मिळत आहेत. आमगाव - देवरी मतदार संघातील कॉंग्रेसची उमेदवारी सहसराम कोरोटे किंवा दुष्यंत किरसान यांनाच मिळणार, अशी चर्चा अजुनही मतदार संघात होत आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विलास चाकाटे यांच्याही नवाची चर्चा आता मतदार संघात होऊ लागली आहे. आमगाव मतदार संघात कॉंग्रेस उमेदवारांची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे. तर अनेक अपक्ष उमेदवारांची नावे आमगाव - देवरी विधानसभा मतदार संघात पुढे येत आहेत. मात्र, चर्चेच्या अंतिम टप्प्यात सहसराम कोरोटे व दुष्यंत किरसान यांचेच नाव पुढे येणार असल्याचे बोलले जात असून, या दोन उमेदवारा पैकी कोणीतरी एक कॉंग्रेसचे उमेदवार म्हणुन घोषीत होणार असल्याची चर्चा आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

छत्तीसगढ़ के आसमान पर बिखरेगी तिरंगे की झटा नया रायपुर में सूर्य किरण का रोमांचक एयर शो 5 नवंबर को फाइटर प्लेन मनूवर करते हुए बनाएंगे हार्ट, डायमंड, लूप, ग्रोवर, डान जैसी कई फार्मेशन नौ फाईटर प्लेन आधे घंटे तक आसमान में दिखाएंगे करतब