दारूच्या पैशांसाठी आईचा खून; मुलाची विहिरीत उडी मारून आत्महत्या !

गोंदिया ( सालेकसा ) : सालेकसा तालुक्यातील कुणबीटोला गावात आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. दारू पिण्यासाठी पैशांच्या वादातून मुलाने आईचा निर्दयीपणे कुऱ्हाडीने खून केला आणि स्वतः विहिरीत उडी मारून जीवन संपवल्याने गावात खळबळ उडाली आहे.फिर्यादी गजेन्द्र फत्तेलाल बनोठे (34) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मृतक सुलकनबाई बनोठे (75) व आरोपी लेखराज बनोठे (54) हे एकत्र कुटुंबात राहत होते. 15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 3 च्या दरम्यान, लेखराजने दारू पिण्यासाठी आईकडे पैशांची मागणी केली. सुलकनबाईंनी पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या लेखराजने त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून त्यांचा मृत्यू केला. आईच्या हत्येनंतर लेखराजने घराशेजारील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या दुहेरी घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.सालेकसा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 395/2024 नोंदवण्यात आला असून, तपास पोलीस उपनिरीक्षक मयुरी नागदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांनी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

छत्तीसगढ़ के आसमान पर बिखरेगी तिरंगे की झटा नया रायपुर में सूर्य किरण का रोमांचक एयर शो 5 नवंबर को फाइटर प्लेन मनूवर करते हुए बनाएंगे हार्ट, डायमंड, लूप, ग्रोवर, डान जैसी कई फार्मेशन नौ फाईटर प्लेन आधे घंटे तक आसमान में दिखाएंगे करतब