देवरीच्या बाबुराव मडावी विद्यालय  शाळेत सेवानिवृत्ती सत्कार कार्यक्रम साजरा.

देवरी : शुक्रवारी(ता.३१जानेवारी) रोजी देवरी येथील बाबुराव मडावी विद्यालयातील  मुख्याध्यापक एस.एस. बुराडे सर यांचा सेवानिवृती सत्कार कार्यक्रम शाळेत घेण्यात आला.
           या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा संस्थेचे अध्यक्ष  गो. म. कन्हाके साहेब हे होते.या प्रसंगी शाळा संस्थेचे सचिव  दा. अ. सिंगनजुडे साहेब, शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक  आय.एम. पटले सर, वंदना हायस्कूल चे प्रभारी मुख्याध्यापक श्री मेश्राम सर व श्री कातोरे  हे प्रामुख्याने उपस्थित होते. 
   यावेळी  सत्कार मुर्ती  एस. एस.बुराडे यांचेसह त्यांच्या पत्नी रत्नमालाताई बुराडे यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देवून सत्कार करण्यातआला. या दरम्यान  बाबुराव मडावी शाळेचा प्रभारी. मुख्याध्यापकाचा पद‌भार  आय.एम. पटले यांना देण्यात आला.      
            या कार्यक्रमाचे प्रास्तावीक श्री चाकाटे सर यांनी तर संचालन  व्ही.जी. मुंढे यांनी केले आणि उपस्थितांचे आभार  किनाके मँडम यांनी मानले.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें