गोंदिया ( देवरी ) ; नागपुर – रायपुर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे अवघ्या काही महिन्यांतच पितळ उघडे पडले आहे. पहिल्याच तेही अल्पशा पावसाने पूल खचणे, रस्त्यावर पाणी साचणे, कठडे वाहून जाणे, रस्त्यालगत असलेले संरक्षक बेल्ट मुळासह वाहून जाणे, आदी प्रकार होत आहेत. देवरी तालुक्या हद्दीतील मरामजोब घाटातील पूल अनियोजीत बांधकामामुळे खचला आहे. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागपुर – रायपुर महार्गावरील देवरी तालुक्याच्या मरामंजोब घाटातील पूल कत्राट दिलेल्या संबधीत कंपनीच्या अनियोजीत बांधकामामुळे खचला आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यातून मोठा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. ऐक वर्षांपूर्वीच सदरील महामार्गाचे काम झाले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून महामार्गाला तडे पडणे, पुलास भगदाड पडणे आदी प्रकार पुढे आले आहेत. यामुळे वाहनधारकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. याची दखल महामार्ग विभागाने घेण्याची मागणी होत आहे.
