देवरीमध्ये रात्री-अपरात्री बत्ती गुल ! वीज खात्याचा अनागोंदी कारभार



नागरिकांत संताप: कमी दाबाचा पुरवठा. . .


गोंदिया ( देवरी )  ; देवरी शहरासह तालुक्यात पावसाळ्यातवीज गायब होणे उचित असते. मात्र, पावसाळा येन्यापुर्विच रविवारी दि.15 रोजी रात्री वीज गायब झाल्याने नागरिकांनी संतापव्यक्त केला आहे. तर आज सोमवार कार्यालयीन दिवसी दि.16 रोजी सकाळी 9.30 विज सतत दोनदा झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वीज दरवाढ़ करून सरकार धनाढ्य लोकोना फायदा करून देते. तर सामान्य लोकांना भुरदंड पड़तो. उकाड्यात वीज खंडित करून तो पुरवठा दुसरीकडे तर केला जात नाही ना..? अशी शंका असून, अशा लोकांना घरी बसवावे लागेल, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

रविवारी रात्री 12 वाजता दरम्यान व सोमवारी सकाळी 9.30 वाजता च्या सुमारास वीज गायब झाल्याने नागरिकांनी वीज खात्याच्या कारभाराला कंटाळल्याचे सांगितले, वारा, पाऊस नसूनही वीज गायब झाल्याने उकाड्याने त्रस्त जनतेने वीज खात्याच्या अनागोंदी कारभाराबाबत असंतोष व्यक्त केला आहे. साधारणपणे गेल्या महिन्यात अनेकदा शटडाऊन घेतले. मात्र,अद्यापही दुसरुस्ती होत नाही. आणखीन शट डाऊन घ्यावे. मात्र, रात्रीच्या वेळी अंधार करू नये, असे मत विज ग्राहकांनी व्यक्त केले. आमगाव विद्युत डिविजन स्टेशनचे काम आमदार संजय पुराम यांच्या कड़क भूमिकेमुळे पूर्णत्वाकडे येत आहे. तरीही वीजपुरवठा असा खंडित होण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

उकाड्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवा…

पावसाळ्यापूर्वी वीज खाते सक्रिय असल्याचे दाखवते. प्रत्यक्षात रात्रीच्या वेळेत वीज गायब होत असल्याने विज ग्राहकांचा संताप अनावर होतो. उकाडा किंवा डासांच्या प्रादुर्भावामुळे योग्य झोप घेणे कठीण असते, त्यामुळे जुन महिन्यात वीज सुरळीत व विनाखंडित ठेवण्याची मागणी विज ग्राहकांनी केली आहे.

शट डाऊनला अर्थ काय?

दरवर्षीं एप्रिल-में महिन्यात तातडीची वीज दुरुस्तीची कामे करण्याच्या नावाखाली वीज खाते कार्यमग्न असल्याचे चित्र निर्माण करते. प्रत्यक्षात नेमके काय केले जाते, हा प्रश्नच आहे. शट डाऊन केल्यानंतर वीज ग्राहक संयमाने समजून घेत असतो.परंतु उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित करून त्रास देऊ नका असे आमदार संजय पुराम यांचे म्हणने आहे.

आता इनव्हेटर घ्यायला हवेत…

राजकारणी मंडळी निवडणूक काळात पैशाची बंडले घेऊन दारोदारी जाऊन मते मागतात. ते पैसे विज ग्राहकांनी न घेता त्यांच्याकडे इनव्हेटरची मागणी केल्याशिवाय गत्यंतर नसल्याचे नागरीकांत आता चर्चा रंगल्या आहेत.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

छत्तीसगढ़ के आसमान पर बिखरेगी तिरंगे की झटा नया रायपुर में सूर्य किरण का रोमांचक एयर शो 5 नवंबर को फाइटर प्लेन मनूवर करते हुए बनाएंगे हार्ट, डायमंड, लूप, ग्रोवर, डान जैसी कई फार्मेशन नौ फाईटर प्लेन आधे घंटे तक आसमान में दिखाएंगे करतब