देवरी तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क कोमात,अवैध दारू विक्री जोमात….

गावागावांतील चित्र; वरिष्ठांनी लक्ष घालण्याची मागणी…

गोंदिया ( देवरी ) : तालुका हा नक्षलग्रस्त तालुका असुन तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक गावोगावी देशी – विदेशा , विषारी हातभट्टी दारू विक्री सुरू आहे. त्याचबरोबर विना परवाना देशी-विदेशी दारू विक्रीही जोमात चालू आहे. या दारूमुळे अनेकजण मरण पावले आहेत. तर अनेकजण मरणाच्या दारावर आहेत. अनेकांचे दारूमुळे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या अवैध दारू विक्रेत्यांवर किरकोळ कारवाई केली जाते, तर या पकडलेल्या किती दारू विक्रेत्यांवर कोणत्या विभागात गुन्हे दाखल होतात. हा संशोधनाचा विषय आहे.

अनेकवेळा महिन्यातून एकदा राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी खासगी गाडी घेऊन येतात. दारू विक्री करणार्‍यांना पकडतात. त्यांच्याकडून हजार रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंत रोख रक्कम घेऊन त्यांना त्याच ठिकाणी सोडून देतात. ही अवैध हातभट्टी दारू व विना परवाना देशी-विदेशी दारू विक्री राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी विभाग यांच्या आशीर्वादाने जोमात सुरू आहे. याचा त्रास महिला, सर्वसामान्य नागरिक यांना होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. ग्रामीण भागातील गल्ली-बोळात व्यावसायिकांनी देशी-विदेशी व हातभट्टीचा दारू विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. या विक्रेत्यांना देशी-विदेशी दारू पुरवठा करण्यासाठी मानस ठेवली गेली आहेत.

विशेषता तालुक्याच्या काही ग्रामीन भागात मोह फुल हातभट्टीचे केंद्रही सुरू केले आहेत. ही हातभट्टी दारू युरिया काही रासायनिक व केमिकल वापरून तयार केलेली असते. त्यातच मोहफुल, खराब गूळ, इतर रासायनिक केमिकल यामुळे या दारूचा उग्र वास येत असतो. तसेच ही दारू कसल्याही भांड्यात, बाटल्यात, डब्यात व ट्यूबमध्ये भरली जाते. यामुळे ही दारू विषारी झाली आहे. ही हातभट्टी दारू ओढ्याला, डोंगरदर्‍या, झाडी यामध्ये राजरोसपणे उत्पादन केली जाते. याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने जानिव पुर्वक दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.

तालुक्यातील गावोगावी एक ते पाच ठिकाणी गल्ली-बोळात अवैध देशी-विदेशी दारू विक्रीची दुकाने थाटली आहेत. या दुकानदारांना राजरोसपणे दिवसा व रात्री चारचाकी, दुचाकी गाडीवरून देशी व विदेशी दारूचे बॉक्स पोच केले जातात. हा व्यवसाय सध्या राज्य उत्पादन शुल्क अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने मोठ्या धुमधडाक्यात देवरी तालुक्यात चालू आहे. या अवैध व्यवसायामुळे सर्वसामान्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. तर अनेक लोक मरणही पावले आहेत. याला आशीर्वाद कोणाचा हा संशोधनाचा विषय आहे. जादा दराने दारुची विक्री होत आहे. तर देशी – विदेशी दारूही बनावट असल्याची चर्चा आहे. हातभट्टी दारूची बाटली केवळ 20 रुपयाला मिळते. ही दारू स्वस्त मिळत असल्याने तलफ भागविण्यासाठी सर्वसामान्य दारू पिणार्‍यांनाही परवडते. पण ही हातभट्टी दारू विषारी असुनही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कर्मचारी निन्द्रां अवस्तेत असल्याचे चित्र देवरी तालुक्यात आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

छत्तीसगढ़ के आसमान पर बिखरेगी तिरंगे की झटा नया रायपुर में सूर्य किरण का रोमांचक एयर शो 5 नवंबर को फाइटर प्लेन मनूवर करते हुए बनाएंगे हार्ट, डायमंड, लूप, ग्रोवर, डान जैसी कई फार्मेशन नौ फाईटर प्लेन आधे घंटे तक आसमान में दिखाएंगे करतब