गोंदिया ( देवरी ) : नगरपंचायत देवरीच्या सभापती पदाच्या निवडणुका आज (दि.२४) ला देवरी नगरपंचायतच्या सभागृहात घेण्यात आल्या. त्यामध्ये आफताब शेख यानां नगरपंचायतचे सार्वजनिक बांधकाम सभापती व पाणी पुरवठा सभापती घोसीत करन्यात आले. सोबतच संजु शेषलाल उईके स्थायी समिती अध्यक्ष (पदसिध्द) नगराध्यक्ष तथा पदसिध्द सभापती, प्रज्ञा प्रमोद संगीडवार सभापती, स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती , संजय रतिराम दरवडे , अर्थ नियोजन आणि विकास, क्रिडा समिती सभापती , सिता प्रकाश रंगारी सभापती, महिला बालकल्याण व सांस्कृतीक कार्य समिती सभापती यांच्यावर्णी लागली आहे.
सदर निवडणुकीत कोणतेही मतदान न घेता निवडणूक बिनविरोध आणि शांततेत पार पडली. निवडणूक प्रक्रियेला सकाळी 11 वाजता सुरुवात झाली अकरा ते बारा वाजेपर्यंत समिती सभापती पदाचा अर्ज दाखल करणे होते. त्यामध्ये सर्व सभापतीची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेमध्ये पीटासीन अधिकारी म्हणून तहसीलदार महेंद्र गणवीर , मुख्याधिकारी करिश्मा वैद्य , कर अधिकारी आणि कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. यावेळी देवरी तालुका भाजपचे संपूर्ण पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
