गोंदिया ( देवरी ) : मा. श्री पोलीस अधीक्षक गोरख भामरे साहेब गोंदिया मा. श्री. नित्यानंद झा अपर पोलीस अधीक्षक साहेब गोंदिया कॅम्प देवरी मा. श्री विवेक पाटील सा. उपविभागीय पोलीस अधिकारी सा. देवरी चे मार्गदर्शनात व सुचणेप्रमाणे मिळालेल्या गोपनिय माहीती वरुन नकटी ते भरेंगावाकडे ट्रकमधुन अवैध जनावरे वाहतुक होत आहे. अशा खबरेवर ठाणेदार प्रविण डांगे सा. यांचे सुचनेप्रमाणे भरेंगाव चौकात पो. हवा करंजेकर/११५४, पो. ना. कांदे/१८१३, जांगळे/१८८०, पो.शि. मेंढे/१९७७, कालापहाड/२२१७, मपोशि वासनिक/२३३४ पोलीस स्टाफसह नाकाबंदी लावुन नकटी ते भरंगावाकडे रोडनी एक बारा चक्का ट्रक क्र एम.एच. ४० बी.जी. १५८३ यास नाकाबंदी दरम्यान थांबवुन वाहन चालक व त्याचे सोबती यांचे नाव, पत्ता विचारले असता त्यांनी १) नईम नजीर पठान, वय ३७ वर्ष ०२) अब्दुल काशीद अब्दुल वाहब, वय ४८ वर्षे ०३) हामीद नुरखा खान वय ४८ वर्षे तिन्ही रा. गुलाम नबी शाळेजवळ पठाणपुरा, मुर्तीजापुर, ता. मुर्तीजावुर, जि. अकोला असे सांगितल्याने वाहनाची पाहणी केली असता ट्रक च्या डाल्यामध्ये एकुण ४३ जनावरे किंमती २,२४,०००/रु. व ट्रकची किंमत १२,००,०००/रु असा एकुण किंमती १४,२४,०००/ रुपयाचा माल जप्त करुन अवैधरित्या जनावरे कोंबुन वाहतुक करणा-यावर कलम ११(१) (ड) प्रा.नि.वा.सं.का.१९६० सह कलम ५ (अ), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ सहकलम ३ (५) भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कार्यवाही करुन आरोपीस ताब्यात घेण्यात आले.
गुन्हयाचा पुढील तपास मा.श्री. प्रविण डांगे पोलीस निरीक्षक साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पो. हवा. ग्यानिराम करंजेकर/११५४ पोस्टे देवरी हे करीत आहेत.
