गोंदिया ( देवरी ) : दिनांक १२/११/२०२५ रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री गोरख भामरे साहेब गोंदिया यांचे सुचनेप्रमाणे मा. श्री अभय डोंगरे सा. अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, मा. श्री विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधीकारी सा. यांचे मार्गदर्शनात व सुचणेप्रमाणे मिळालेल्या गोपनिय माहीती वरुन पुतळी ते कोयलारी रोडनी पिकअप मधुन अवैध जनावरे वाहतुक होत आहे. अशा खबरेवर ठाणेदार प्रविण डांगे सा. यांचे आदेशाने पुतळी ते कोयलारी जाणारे रोडवरील चौकात पो. हवा. निलेश जाधव ११८३, पो.ना. पंकज पारधी, पो.शि. घनशाम में /१९७७, अनिल ऊके / २००१ यांनी पुतळी ते कोयलारी रोडनी एक पिकअप क्र. एम.एच. ०९ एफ. एल. १२३६ याचा पाठलाग करुन वाहन चालक यास थांबवून नाव, पत्ता विचारले असता त्यांनी १) मोहीत नामदेव लंजे, वय १९ वर्षे, रा. नवेगावबांध वाहन मालक ०२) किशोर नामदेव लंजे, वय २५ वर्षे, रा. नवेगावबांध, ता. अर्जुनी/मोर. जि. गोंदिया असे सांगितल्याने वाहनाची पाहणी केली असता पिकअप च्या डाल्यामध्ये एकुण ०९ जनावरे किंमती ६३,०००/ रु. व वाहनाची किंमत ६,००,०००/रु असा एकुण किंमती ६,६३०००/ रुपयाचा माल जप्त करुन अवैधरित्या जनावरे कोंबुन वाहतुक करणा-यावर कलम ११ (१) (ड) प्रा.नि.वा.सं.का. १९६० सह कलम ५ (अ), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ कार्यवाही करुन आरोपीस ताब्यात घेण्यात आले..
गुन्हयाचा पुढील तपास मा.श्री. प्रविण डांगे पोलीस निरीक्षक साहेब यांचे मार्गदर्शनाखाली स.फौ. प्रितम खांबले ७५१ पोस्ट देवरी हे करीत आहेत.








