देवरी पोलीस स्टेशन अंतर्गत अंमली पदार्थ विरोध पोलीस स्टेशन हददीमध्ये जनजागृती मोहीम राबवुन गावांना व शाळेना भेटी देवुन प्रभात रॅली काढून विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
गोंदिया ( देवरी ) : दिनांक १३/०८/२०२५ रोजी मा. पोलीस महासंचालक सा. महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे निर्देशानुसार दिनांक १३/०८/२०२५ ते १८/०८/२०२५ पर्यंत जिल्हयात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबविण्यात येत असल्याने मा. श्री पोलीस अधीक्षक गोरख भामरे साहेब, मा. श्री अपर पोलीस अधिक्षक सा. अभय डोंगरे, मा. श्री विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधीकारी सा., उपविभाग देवरी चे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रविण डांगे सा. यांनी पोलीस स्टेशन हददीतील सिध्दार्थ हॉयस्कुल व जुन्यी अर कॉलेज डवकी, माण्यमीक विदयालय सुरतोली, आदिवासी शासकिय आश्रम शाळा शेंडा, वसंता हॉयस्कुल व ज्यु. कॉलेज डोंगरगाव येथील शाळांना भेटी देवुन अंमली पदार्थ विरोधी जनजागृती शपथ घेवुन शाळेकरी मुलांचे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करुन गावातील मुख्य मार्गाने प्रभात फेरी काढण्यात आली. तसेच लोहारा, डबकी येथील गांवाना भेटी देवुन अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यात आली. दिनांक १६/०८/२०२५ रोजी नशेचे प्रकार, परिणाम व त्यावरल इपाय याबाबत मनोहर भाई पटेल व ज्यु. कॉलेज देवरी, कमलादेवी हॉयस्कुल व ज्यु. कॉलेज देवरी येथे वर्ग ०८ ते १० व ११ ते १२ दोन गटात निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. दिनांक १७/०८/२०२५ रोजी नशामुक्ती विषयावर चित्रकलास्पर्धा सिएम इंग्लीस पब्लीक स्कुल देवरी, ब्लॉशम पब्लीक स्कुल देवरी येथे घेण्यात येत असुन दिनांक १८/०८/२०२५ रोजी नशेचे सामाजीक परिणाम यावर वसंता हॉयस्कुल व ज्यु. डोंगरगाव येथे पटनाटय चे आयोजन करण्यात आले.









