गोंदिया ( देवरी ) : पोलीस अधीक्षक गोरख भामरे गोंदिया, नित्यानंद झा अपर पोलीस अधीक्षक गोंदिया केंम्प देवरी , विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनात व सुचणेप्रमाणे प्रविण डांगे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन देवरी यांनी पो.स्टे.हद्दहीतील इसम नामे रतिराम मोहन भलावी वय. ४० वर्षे रा. पाथरगोटा ता.सडक/ अर्जुनी जि. गोदिया हा पोलीस स्टेशन हृदीमध्ये अवैध दारु बाळगुन दारु विक्रीकरणे अशा प्रकारचे गुन्हे करीत आहे.
त्याचेवर वारंवार प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असतांनासुध्धा त्याचे वर्तणात कोणताच बदल होत नाही व कायदयाच्या धाक त्याचे मनात उरलेला दिसून येत नाही. त्यांचे या अवैध धंद्यामुळे देवरी शहरातील तरुण वर्ग या बाबीस बळीपड़त आहेत. अशाप्रकारचे बेकायदेशिर कृत्ये रोखण्यासाठी त्याचेवर प्रतिबंधक कारवाई करनेकामी उपविभागीय दंडाधिकारी देवरी यांचेकडे महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चेकलम ५६ (१),(अ) प्रमाणे प्रस्ताव तयार करुन पाठविले असता सदर प्रकरणाची मा.वरुणकुमारशहारे उपविभागिय दंडाधिकारी सा. अर्जनी/मोरगाव यांनी चौकशी व सुनावणी करुन नमुद इसमाला गोदिया जिल्हयाचे बाहेर ०१ महिन्याकरीता हृदपार केले आहे.









