■ भिलाई येथे क्षत्रिय मरठे कलार समाजाच्या वतीने गोंदिया जिल्हातील पहिली महिला बाल दंत चिकित्सक म्हणून सत्कार.
गोंदिया ( देवरी ) : नक्षलग्रस्त आणि आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्हातील शेवटच्या टोकावर वसलेल्या देवरी तालुक्यातील डॉ. डिंपल किसन तिराले जिल्ह्यातील एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. जिल्ह्यातील पहिली महिला बाल दंत चिकित्सक म्हणून त्या छत्तीसगड राज्यातील न्यू खुर्सीपार,भिलाई येथे रविवार रोजी सन्मानित झाल्या असून त्यांच्या परिश्रमाने त्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत.
डॉ. डिंपल तिराले यांनी आपल्या दंत चिकित्सा क्षेत्रामध्ये करियर करण्याची स्वप्न पाहिली होती. त्याचं शिक्षण आणि प्रशिक्षण पूर्ण करून, त्यांनी आपल्या जन्मगाव देवरी येथे दंत चिकित्सा सेवा सुरू केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागातील मुलांमध्ये दंत आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणाऱ्या डॉ. डिंपल तिराले यांनी अनेक आरोग्य शिबिरांचीही आयोजन केली आहेत. त्यांच्या कार्यामुळे जिल्ह्यातील मुलं योग्य दंत आरोग्य आणि उपचार मिळवू शकतात हे सत्य ठरले आहे.
रविवार रोजी छत्तीसगड राज्यातील भिलाई येथे पार पडलेल्या वार्षिक स्नेहसम्मेलनात यांचा सत्कार झाला असून कार्यक्रमात बालाघाट येथील नगरपालिकाचे माजी नगराध्यक्ष अनिल धुवारे, बालाघाटचे क्षत्रिय मरठा कलार समाजाचे संजीव धुवारे, देवरी येथील समाज सेवक तथा सुप्रसिध्द डॉ. अनिल चौरगडे, अमरावती येथील सर्ववर्गीय कलार समाजाजे राष्ट्रीय अध्यक्ष रेखा पिंप्राले, गोंदिया येथील क्षत्रिय मराठा कलार समाजाचे उपाध्यक्ष पूजा डहाके, गोंदिया येथील क्षमक समाजाचे महिला जिला प्रभारी नीता धपाटे,माजी अध्यक्ष शोभा धुवारे यांच्यासह छत्तीसगड राज्य क्षत्रिय मरठे कलार समाजाचे संस्थापक सचिव लोकचंद सोनवणे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ. तिराले यांच्या कार्याची प्रशंसा करताना, “डॉ. डिंपल तिराले यांनी बाल दंत चिकित्सा क्षेत्रात दिलेलं योगदान अत्यंत उल्लेखनीय आहे. त्यांचे कार्य अन्य महिलांसाठी एक आदर्श आहे.” असे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले.
या वेळी डॉ. तिराले यांच्या या यशाच्या प्रवासाने समाजातील इतर युवा वर्गाला प्रेरणा मिळणार आहे आणि त्यांच्यातही शिक्षण व करियर घडवण्याची इच्छा जागृत झाली आहे. त्यांची इच्छाशक्ती आणि जिद्द हे प्रेरणादायी असून ग्रामीण भागात आरोग्य सेवेत सुधारणा घडवून आणली आहे. सदर सत्कार सोहळ्यामध्ये समाजातील जेष्ठ नागरिक , कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांनी डॉ. डिंपल तिराले यांच्या अभिनंदन केले. आहे.
