गोंदिया (देवरी) : देवरी तालुक्यातील देवरी शहरातील आठवडी बाजार मुख्य रस्त्यावर भरत असल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असून नागरिकांचे हाल होत आहेत. तालुक्यातील सर्वात मोठे आठवडी बाजार म्हणुन देवरी शहराची ओळख आहे. देवरी तालुक्या अंतर्गत शेकडो गावे येत असल्याने येथील आठवडी बाजारही मोठा भरत असतो. मंगळवारी भरणारा बाजार हा शहरातील मुख्य वाहतुकीचे ठिकान असलेल्या चिचगड रोडवर भरतो. सद्यस्थितीत हा बाजार राणी दुर्गावती चौक ते आफताब मंगल कार्यालया पर्यंत मुख्य रस्त्यावरच भरत आहे. ज्यामुळे बाजारत येणार्या व्यापार्यांचा व्याप सतत वाढत असल्याचे दिसुन येत आहे. रस्त्यावर भरणा-या बाजारामुळे येथे सतत वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. जेथे बाजार भरतो त्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरत असते. त्यामुळे येथील नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
परिसरातील ग्रामीन भागातील छोट्या गावात आठवडी बाजार भरत नाही. त्यांना ही भाजी पाला व इतर खरेदिसाठी देवरीच्या आठवडी बाजारालाच यावे लागते. येथे फळवाले, भाजीपाला विक्रेते, मिठाईवाले, धान्य विक्रेते व्यापारी मोठ्या संख्येने येत असतात. लाखोंची ऊलाढाल होणा-या देवरी आठवडी बाजाराची जागेअभावी दैना झालेली पाहावयास मिळत आहे. रस्त्यावर भरणा-या बाजारामुळे वाहतुकीची कोंडी होवुन नागरिकांचे हाल होत असल्याबाबत ग्रामस्थांनी यापुर्वी संबधीत विभागाकडे निवेदन देखील दिलेले आहे. देवरी शहरात बाजारच्या जागेचा प्रश्न अनेक वर्षांपासुन भेडसावत आहे. आठवडे बाजार साठी पर्यायी जागा शोधने हे नगरपंचायत समोर एक आव्हानच आहे. बाजारच्या दिवशी दुकाने रसत्यावर असल्याने वाहतुकिच्या कोंडीत भरच पडत आहे. तरी आठवडे बाजार रस्त्यावरुन हटविण्यात यावा तसेच स्वच्छ परिसरात बाजार भरविण्यात येण्याची मागणी शहर वाशीयांकडून कायम होत आहे.
पार्कींगची समस्या कायम…
देवरी शहरातील मंगळवारी भरनारा आठवडी बाजार हा मोठ्या स्वरुपात भरत असल्याने बाजारात व्यापारी व ग्राहकांची संख्या लाखोच्या संख्येत असते. ज्यात बाजारात येनारे ग्राहक दुचाकी व चारचाकीने या बाजारत खरेदी करायला येत असतात. पंरतु देवरी नगरपंचायत तर्फे बाजार परीशरात वाहन पार्कींगची कोनतीही व्यवस्था नसल्याने बाजारात येनार्या ग्राहकांना रसत्याच्या कडेला किवां रसत्याजवळ असलेल्या दुकाना समोर वारने उभे करुन खरेदी करायला जावे लागते. ज्यामुळे पार्कींगची व्यवस्था कायम आहे. व ज्याने इतर वाहन चालकानां वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतो. नगरपंचायतने चिचगड रोडवर भरीत असलेल्या व्यापारी व दुकानदारांना बाजाराच्या आतील ओट्यावर बसवाव व पार्कींगची पर्यायी व्यवस्ता करावी असी मागनी आता देवरी शहर वासीयाकडुन होऊ लागली आहे.
प्रतिक्रीया…
नगरपंचायतच्या कर्मचार्यानां सुचना दिलेल्या आहेत. ते येत्या मंगळवारला आठवडी बाजारात येणार्या व्यापारी व दुकानदारांना नगरपंचायत तर्फे बनविण्यात आलेल्या ओट्यावर हलविन्याचा (बसविण्याचा) प्रयत्न करनार आहेत जेने करुन राणी दुर्गावती चौक ते आफताब मंगल कार्यालया पर्यंत असलेली रसत्यावरील दुकाने बाजाराच्या आतील परिसरात बसतीन ज्यामुळे चिचगड रोडवलील वाहतुक कोंडी कमी होईल. व सतत व्यापार्यांची वाढती संख्या बघता बाजार दुसरी कडे हलवता येनार की नाही याचाही विचार नगरपंचायत तर्फे केला जाणार आहे.
करिश्मा वैद्ये (मुख्याधिकारी नगरपंचायत देवरी)
प्रतिक्रीया…
देवरी शहरातील आठवडी बाजारातील चिचगड रोडवर वाहतुक कोंडी ही मोठी समस्या अनेक वर्षापासुनची आहे. पण या करीता बाजारात येनारे दुकानदार व व्यापरी यांनी चिचगड रोड सोडुन नगरपंचायत देवरी तर्फे तयार करन्यात आलेल्या बाजार आतील ओट्यावर दुकाने लावावी जेने करुन काही प्रमानात वाहतुक कोंडीचा त्रास कमी होईल.
संजय दरवडे ( नगरसेवक नपं. देवरी)









