धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत नागरिकांना मिळणार सर्व शासकीय दाखल्यांचा लाभ

गोंदिया ( देवरी ) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, कृषी विभाग, वन विभाग व इतर विभागांच्या संयुक्त विद्यमाने धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना वैयक्तिक व सामूहिक योजनांचा लाभ देण्यासाठी 15 जून ते 30 जून या कालावधीत देवरी तालुक्यातील एकूण 7 ठिकाणी धरती आबा जनभागीदारी अभियान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत देवरी तालुक्यातील 49 गावांचा समावेश आहे. शिबिराचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
अ.क्र. शिबिराचे ठिकाण आयोजित दिनांक
1 स्वामी रामकृष्ण आदिवासी आश्रमशाळा, मकरधोकडा 23.06.2025
2 शासकीय आदिवासी आश्रमशाळा, पालांदूर/जमी 24.06.2025
3 जिल्हा परिषद शाळा आवार, धमदीटोला 25.06.2025
4 शासकीय आदिवासी आश्रमशाळा, पुराडा 27.06.2025
5 शासकीय आदिवासी आश्रम शाळा, कडीकसा 27.06.2025
6 शासकीय आदिवासी आश्रम शाळा, ककोडी 27.06.2025
7 शासकीय आदिवासी आश्रमशाळा बोरगाव /बाजार 30.06.2025

   तसेच दि. 27 जून रोजी सर्व शासकीय आश्रमशाळेत प्रवेश उत्सव आयोजित करण्यात येणार असल्याने त्याच दिवशी सर्व शासकीय आश्रमशाळेत या शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. शिबिरा अंतर्गत आधार कार्ड, रेशनकॉर्ड, पी.एम. किसान सन्मान निधी, किसान क्रेडिट कार्ड, जातीचे दाखले, पी.एम. मातृवंदना योजना, पी.एम. उज्वला योजना, आयुष्यमान भारत, पी.एम.जन आरोग्य योजना, पी.एम. जनधन योजना, शेतकऱ्याची ओळख पत्र (फार्मर आयडी), म.न.रे.गा. जॉब कार्ड, पी. एम. सुरक्षा विमा योजना (PMSBY), पी.एम. जनज्योती विमा योजना (PMJJBY), सुकन्या समृद्धी योजना, अटल पेंशन योजना, पी.एम. मृदा योजना, ई-श्रम कार्ड, मृदा आरोग्य कार्ड, सामाजिक सुरक्षा निवृत्ती वेतन योजना व इतर शासकीय योजनांचे दस्तऐवज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी आवश्यक ती कागदपत्रे घेऊन शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें